राज्यातील एसटी प्रवाशांसाठी (stops)मोठा दिलासादायक निर्णय जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटी बसस्थानकांवरील सुविधांमध्ये मोठे बदल करण्यात येणार असून १ जूनपासून अनेक सेवा प्रवाशांसाठी अधिक सुलभ आणि स्वस्त होणार आहेत.नवीन घोषणेनुसार राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतागृह सेवा पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे.

यामुळे प्रवाशांना अतिरिक्त (stops) शुल्काचा त्रास सहन करावा लागणार नाही. यासोबतच प्रवाशांच्या सोयीसाठी मोठ्या प्रमाणात बससेवा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच सुमारे ८ हजार नव्या बस ताफ्यात दाखल होणार आहेत.प्रवाशांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन एसटी स्थानकांवर परवडणाऱ्या दरात नाष्टा उपलब्ध करून देण्याचाही निर्णय घेतला आहे
केवळ ३० रुपयांत नाष्टा मिळणार (stops) असल्याने ग्रामीण आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.या निर्णयामुळे एसटी प्रवास अधिक सोयीस्कर, किफायतशीर आणि प्रवासीअनुकूल होणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. आगामी काळात एसटी सेवा अधिक आधुनिक आणि सक्षम करण्यासाठी आणखी काही सुधारणा करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत.
.