मोठी बातमी! पुणे विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात,धावपट्टी तात्पुरती बंद

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे भारतीय हवाई दलाच्या विमानाच्या (plane crash) अपघातामुळे काही काळासाठी हवाई वाहतूक विस्कळीत झाली होती. शुक्रवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आली. सुदैवाने या अपघातात विमानातील सर्व कर्मचारी सुरक्षित असून कोणत्याही नागरी मालमत्तेचे नुकसान झाले नाही, अशी माहिती हवाई दलाने दिली.

या घटनेनंतर विमानतळ प्रशासन आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काम सुरू केले. धावपट्टी मोकळी करून ती पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. याबाबत सर्व संबंधित विमान कंपन्यांनाही माहिती देण्यात आली होती, ज्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधला होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दुरुस्तीचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सकाळी साडेसात वाजल्यापासून उड्डाण सेवा सुरू होण्याची शक्यता आहे, तर आठ वाजल्यापासून विमाने उतरण्यास सुरुवात होईल.
या घटनेनंतर काही तास हवाई सेवा प्रभावित झाली असली तरी प्रशासनाच्या तातडीच्या कारवाईमुळे दिवसभरातच पुण्यातील हवाई वाहतूक पूर्णपणे पूर्ववत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा

आता 100 रुपयांच्या मालावरही द्यावा लागणार टॅक्स

जास्त पगार असूनही बँक कर्ज देत नाहीये? तर ‘या’ ४ गोष्टींकडे लक्ष द्या

MSRTC कडून एसटी बस दरात मोठी वाढ! प्रत्येक तिकिटावर अतिरिक्त चार्जही लागू