आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम जागतिक बाजारावर स्पष्टपणे दिसत आहे. विशेषतः कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये गेल्या काही दिवसांत मोठी चढ-उतार पाहायला मिळाली. (crude oil) युद्ध सुरू असताना कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढत होते, मात्र अलीकडे दोन आठवड्यांच्या युद्धविरामामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात काहीसा दिलासा मिळाला असून कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या आहेत.

सामान्यतः कच्च्या तेलाच्या दरातील बदलाचा थेट परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर होतो. मात्र महाराष्ट्रात यावेळी चित्र थोडं वेगळं दिसत आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असतानाही राज्यात इंधन दरांमध्ये मोठी वाढ झाली नव्हती आणि आता किंमती घसरूनही पेट्रोल-डिझेलचे दर बहुतांश स्थिरच राहिले आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आजच्या दरांमध्ये मात्र काही ठिकाणी किरकोळ बदल दिसून आले आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर १०३.५० रुपये प्रति लिटर असून डिझेल ९०.०३ रुपये प्रति लिटर आहे. पुण्यात पेट्रोल १०४.०४ रुपये आणि डिझेल ९०.५७ रुपये दराने विकले जात आहे. ठाण्यात पेट्रोल १०४.३७ रुपये तर डिझेल ९०.८६ रुपये आहे. सोलापुरात पेट्रोलचा दर १०५.०१ रुपये आणि डिझेल ९१.५३ रुपये आहे. साताऱ्यात पेट्रोल १०४.७६ रुपये आणि डिझेल ९१.२९ रुपये आहे. अमरावतीमध्ये पेट्रोल १०५.४७ रुपये आणि डिझेल ९१.९८ रुपये आहे, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल १०५.३३ रुपये आणि डिझेल ९१.८२ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.
एकूणच कच्च्या तेलाच्या दरात घट झाली असली तरी त्याचा तात्काळ आणि मोठा फायदा ग्राहकांना मिळताना दिसत नाही. पुढील काही दिवसांत आंतरराष्ट्रीय परिस्थिती कशी राहते आणि तेल कंपन्या त्यानुसार दरांमध्ये किती बदल करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा
आता 100 रुपयांच्या मालावरही द्यावा लागणार टॅक्स
जास्त पगार असूनही बँक कर्ज देत नाहीये? तर ‘या’ ४ गोष्टींकडे लक्ष द्या
MSRTC कडून एसटी बस दरात मोठी वाढ! प्रत्येक तिकिटावर अतिरिक्त चार्जही लागू