कोल्हापूर गॅझेट लागू करण्यासाठी प्रयत्न करू : मनोज जरांगे

कोल्हापूर गॅझेटियरची (गॅझेट) अंमलबजावणी झाल्यास राज्यात एकही मराठा कुणबी दाखल्यापासून वंचित राहणार नाही. ते लागू करण्यासाठी प्रयत्न करू, (Manoj Jarange) अशी ग्वाही मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी सोमवारी दिली.

न्यू पॅलेस येथे खासदार शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठा समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची ‘कोल्हापूर गॅझेटियर’ बाबत जरांगे यांच्या समवेत बैठक झाली. खा. शाहू महाराज म्हणाले, कोल्हापूर गॅझेटियरचा आधार घेऊन मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले कायद्याने दिले तर त्या प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी होईल.ॲड. बाबा इंदुलकर म्हणाले, कोल्हापूर गॅझेटियरचे पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेलद्वारे पाठविले आहेत. दिलीप देसाई म्हणाले, कुणबी दाखले व्हॅलिड होत नाहीत. (Manoj Jarange) त्यामुळे जात वैधता समिती बरखास्त करून तहसीलदारांना अधिकार द्यावेत. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत म्हणाले, सारथी संस्था, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा निधी देण्यासाठी प्रयत्न करा.

जरांगे यांची डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी फोनवरून चर्चा बैठकीदरम्यान खा. शाहू महाराज यांनी दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना फोन केला. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी डॉ. जाधव यांच्याशी चर्चा केली. मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील, पुरुषोत्तम खेडेकर, शशिकांत पवार आणि आपण सुरुवातीच्या काळात लढा उभारला. (Manoj Jarange) आता ते काम आपण जोमाने पुढे नेत आहात, असे डॉ. जाधव यांनी सांगितले. सध्या बाहेरगावी असल्याचे सांगताच आपणाला भेटण्यासाठी कोल्हापूरला आवर्जून पुन्हा येऊ, असे जरांगे यांनी यावेळी डॉ. जाधव यांना सांगितले.

हेही वाचा :

पाऊस लांबल्यामुळे वाढली पाणीटंचाईची धग

शालेय बस-व्हॅन शुल्कात तब्बल 15 टक्क्यांनी वाढ?

पीएम किसानचा 23वा हप्ता कधी मिळणार?