शिरजगाव कसबा परिसरात एका ज्येष्ठ महिलेवर अत्याचार व लूटप्रकरणी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उपचारासाठी पायदळ रुग्णालयात जात असलेल्या ६५ वर्षीय महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवून निर्जनस्थळी नेण्यात (shocking incident) आले आणि तिच्यावर अत्याचार करून रोख रक्कम लुटण्यात आली.

ही घटना शनिवारी (ता.१८) घडली असून प्रकरण समोर येताच शिरजगाव कसबा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत काही तासांतच संशयित आरोपीला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आवेज खान युनूस खान (वय २२, रा. कांडली, परतवाडा) असे आहे.
पीडित महिला मध्यप्रदेश सीमेवरील गावातून परतवाडा येथील रुग्णालयात उपचारासाठी पायदळ निघाल्या होत्या. याच दरम्यान आरोपीने “मीही परतवाड्याला जात आहे” असे सांगून त्यांना विश्वासात घेतले आणि दुचाकीवर बसवले. मात्र, परतवाड्याकडे न जाता त्याने त्यांना खरपी शिवारातील निर्जन पांदण रस्त्यावर नेले. तेथे त्याने महिलेवर अत्याचार केला आणि त्यांच्या जवळील सुमारे ६०० रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले.
या घटनेत महिलेला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
हेही वाचा
आता मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश; मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय
हादरवणारी घटना; आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार