बाबा वेंगा या एक मोठ्या भविष्यवेत्त्या होत्या. त्यांचा जन्म 1911 साली (zodiac)बल्गेरियामध्ये झाला. तर मृत्यू 1996 मध्ये झाला. या काळात त्यांनी जगातील अनेक महत्त्वाच्या सास्कृतिक, राजकीय आणि सामाजिक घडामोडींबद्दल भाकीतं केली. असं म्हटलं जातं की त्यांनी आपल्या हयातीमध्ये पुढील पाच हजार वर्षांमध्ये काय होणार आहे? याबाबतची भविष्यवाणी करून ठेववली आहे. त्यांनी हिटरलच्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती, ती खरी ठरल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जातो. त्याचप्रमाणे इग्लंडच्या राणीचा मृत्यू, आणि जपानमध्ये आलेल्या त्सुनामीची देखील त्यांनी भविष्यवाणी केली होती. विशेष म्हणजे बाबा वेंगा या दोन्ही डोळ्यांनी अंध होत्या.

2025 मध्ये काय काय घडामोडी घडणार? याबाबत त्यांची भविष्यवाणी (zodiac)समोर आली होती. ही एक हादरवणारी भविष्यवाणी होती. 2025 मध्ये जगावर अनेक मोठी संकट येतील भूकंप, युद्ध या सारख्या संकटांमुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होईल असं त्यांनी म्हटलं होतं, 2025 मध्ये इंडोनेशिया, अफगाणिस्तान सारख्या देशांमध्ये मोठे भूकंप आल्याचे पहायला मिळाले, एवढंच नाही तर इराण आणि इस्त्रायलमध्ये देखील युद्ध झालं होतं. दरम्यान त्यानंतर 2026 चं भाकीत वर्तवताना त्यांनी म्हटलं होतं की 2026 मध्ये एक मोठं युद्ध होईल, ज्याचा फटका हा पाश्चिमात्य देशांना सर्वात जास्त बसेल. दरम्यान आता 2027 मध्ये काय काय घडामोडी घडणार? याबाबत बाबा वेंगा यांचं भाकीत समोर आलं आहे. 2027 हे वर्ष तीन राशींसाठी वादळी ठरणार आहे. त्यांचं आयुष्यच बदलून जाणार आहे.
वृश्चिक रास – वृश्चिक राशीसाठी 2027 हे वर्ष एका अर्थाने वादळीच ठरणार आहे,(zodiac) मात्र हे वादळ या राशींच्या लोकांमध्ये अनेक सकारात्मक बदल घेऊन येणार आहे. आयुष्यात जेवढ्या संधी मिळाल्या नाहीत तेवढ्या संधी या काळात या लोकांना मिळणार आहे. नोकरीमध्ये प्रमोशन होणार असून, सर्व शत्रूंचा पराभव होईल असा हा काळ आहे.
सिंह रास – सिंह राशींसाठी 2027 हे वर्ष अतिशय शुभ राहणार आहे. या राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार आहे. यापूर्वी आयुष्यात जी संधी मिळाली नव्हती ती संधी या काळात या लोकांना मिळणार आहे. या राशींच्या लोकांच्या हाती मोठा जॅकपॉट लागणार आहे.
मेष रास – मेष राशीचा देखील 2027 मध्ये राजयोग येणार आहे. त्यांना या वर्षांत अनेक प्रगतीच्या संधी मिळणार आहेत