देवळाई : जलवाहिनीसाठी टाकलेल्या खड्यात साडेतीन वर्षीय ईश्वर संदीप भास्कर या चिमुकल्याचा (Child)दुर्दैवी मृत्यू झाला. भास्कर कुटुंबाने मूळ गावी न परतता शहरातच मुलाचे अंत्यसंस्कार केले.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी पोलिस आयुक्त प्रवीण पवार आणि पोलिस अधीक्षक डॉ. विनय कुमार राठोड यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंत्यांकडे कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
स्थानिकांचे आरोप आहेत की, पाईप टाकल्यानंतर खड्डा बुजवण्यात आलेला नाही, अनेक ठिकाणी माती न टाकता पाईप अर्धवटच राहिले आहेत. घटनेच्या दुसऱ्या दिवशीही खड्ड्यावर सुरक्षण जाळी किंवा इतर उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या. कॉलनीतील मुख्य मार्गावर हा खड्डा असल्याने मुले, विद्यार्थी आणि नागरिकांची वर्दळ जास्त असते.

या घटनेमुळे स्थानिकांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला असून, भलेही बालकाचा(Child) दुर्दैवी मृत्यू झाला, तरी सुरक्षा उपाय न केल्याबद्दल चौकशीची मागणी जोरदार केली जात आहे.
हेही वाचा :
हार्दिक पांड्याचा डॅशिंग लुक….
Galaxy S25 FE लाँच होताना स्वस्तात मिळतेय ‘हे’ जुने मॉडेल, त्वरीत करा खरेदी
चपला चोरणाऱ्या मुलाची कथा; आज बनला लाखोंचा लाडका स्टार