बिहारच्या मुजफ्फरपुरमधील एका नवविवाहित (married)युवकाला त्याच्या साडेपाच महिन्यांपूर्वी झालेल्या लग्नानंतर धक्का बसला आहे. युवकाला अचानक एका अज्ञात WhatsApp नंबरवरून मेसेज आणि फोटो आला, ज्यात त्याच्या पत्नीने लिहिले होते”Sorry, मी माझ्या बॉयफ्रेंडशी लग्न करणार आहे.”युवकाने सांगितले की, हा मेसेज पाहताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला विश्वास बसत नव्हता की, त्याची पत्नी असे काही करु शकते.तपासात समोर आले की, पत्नीने घरातून 53 हजार रुपये रोख कॅश आणि 1.70 लाखांचे दागिने घेऊन पळ काढला. युवकाने ताबडतोब कुटुंबियांना माहिती दिली आणि मिठनपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

पीडित युवकाने सांगितले,
“साडेपाच महिन्यापूर्वी माझं लग्न(married) शिवहर येथील युवतीसोबत झालं होतं. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण मागील काही दिवसांपासून ती अनोळखी नंबरवर सतत बोलायची. गुरुवारी ती कॉलेजमध्ये जात असल्याचं सांगून घरी परतली नाही. नंतर मला WhatsApp वर मेसेज आला आणि त्यात तिने फोटोही पाठवला.”या प्रकरणामुळे स्थानिक समाजात मोठा धक्का बसला आहे. पोलीस तपास सुरू असून, आरोपी पत्नीला शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा :
प्रिती झिंटाच्या सांगण्यावरून बदलला होता ‘मॅन ऑफ द मॅच’चा विजेता
IPS अधिकाऱ्यांची बूट पुसण्याची लायकी..,’ मिटकरींनी अंजना कृष्णांविरोधात
महिलेने आधी नग्न होऊन व्हिडिओ कॉल केला, नंतर शिक्षकानेही…