कोचीवरुन अबुधाबीला जाणारे इंडिगोचे विमानाने उड्डाण घेतल्यानंतर पुन्हा काही काळाने कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले आहे. दरम्यान कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अबुधाबीला जाण्यासाठी indigoच्या फ्लाईटने(flight) उड्डाण केले. मात्र विमानात गडबड झाल्याने हे विमान पुन्हा कोची विमानतळावर उतरवण्यात आले आहे.

कोचीवरुन अबुधाबीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात काहीतरी गडबड झाल्याने हे विमान पुन्हा कोचीत उतरवण्यात आले. पायलट प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता फ्लाईट(flight) पुन्हा कोचीत उतरवली. मात्र याधी विमान दोन तास हवेतच घिरट्या मारत असल्याचे समोर आले आहे. अबुधाबीला जाण्यासाठी विमानाने रात्री 12.30 वाजता उड्डाण केले होते. दरम्यान 2.30 वाजण्याच्या सुमारास हे विमान पुन्हा कोचीत लँड करण्यात आले.
फ्लाईट सुरक्षितपणे लँड झाल्यावर सर्व प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. इंडिगोने प्रवाशांना दुसरे विमान उपलब्ध करून देण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. विमानात काही तांत्रिक अडचण झाल्याने हे विमान पुन्हा कोचीत लँड करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. कंपनीच्या तांत्रिक विभागाने फ्लाईटची तपासणी सुरू केली आहे.
या घटनेबद्दल इंडिगोने अजून अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. मात्र दोन तास विमान हवेतच घिरट्या घालत असल्याने प्रवासी घाबरले होते. फ्लाईट सुखरूप लँड होताच त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान सगळे प्रवासी सुखरूप आहेत.
नागपूरमध्ये इंडिगोच्या एका विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. इंडिगोचे विमान नागपूरहून कोलकात्याला जात होते. विमान 6E812 ने उड्डाण करताच, एक पक्षी हवेत आला आणि इंजिनला धडकला. उड्डाणानंतर काही वेळातच पक्ष्याची विमानाला धडक बसली यामुळे विमानाचा पुढचा भाग खराब झाला. परंतु वैमानिकाने हवेत यू-टर्न घेण्याचा निर्णय घेतल्याने नागपुरात आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

इंडिगोचे 6E812 विमानाने सकाळी 7 वाजून 5 मिनिटाने उड्डाण घेतले. आकाशात झेप घेताच एका पक्षाने धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार, पक्षी धडकल्याने विमानाच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.या विमानात माजी आमदार सुधाकर कोहळे, शेखर भोयर आणि काँग्रेस नेते नितीन कुंभलकर प्रवास करत होते.
विमानाच्या आपत्कालीन लँडिंगनंतर आता वरिष्ठ विमानतळ संचालक आबिद रुही यांचे विधान समोर आले आहे. ते म्हणाले की, इंडिगोच्या नागपूर-कोलकाता फ्लाइट क्रमांक 6E812 वर पक्षी धडकण्याची शक्यता आहे. आम्ही या घटनेची चौकशी करत आहोत,अशी माहिती यावेळी देण्यात आली.
हेही वाचा :
महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळी मोठी भरती
विवाहित पुरुषांच्या प्रेमात का पडतात मुली? 5 महत्त्वाची कारणे
राजकीय नात्यांचा उत्सव कधी दिवाळी, कधी शिमगा