एक मोठी बातमी समोर आली आहे. भारत आणि इस्रायलमध्ये लवकरच द्विपक्षीय करार करारावर(deal) स्वाक्षरी करणार आहे. हा करार भारत आणि इस्रायलमध्ये मुक्त व्यापार कराराच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. हा करार अशा वेळी होत आहे जेव्हा भारत आणि अमेरिकेमध्ये टॅरिफवॉर सुरु आहे. या निर्णयामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. यामुळे आर्थिक आणि धोरणात्मक पातळीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलचे अर्थमंत्री बेझालेले स्मोट्रिच ८ ते १० सप्टेंबर भारत दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी भारत आणि इस्रायलमध्ये आर्थिक संबंध वाढवण्यावर भर दिला जाईल. यावेळी दोन्ही देशात द्विपक्षीय व्यापार करारावर(deal) स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे.

यावेळी स्मोट्रिच भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन, वाणिज्य विभागाचे उद्योगमंत्री पीयूष गोयल आणि गृहनिर्माण व शहर विकार मंत्री मनोहर लाल खट्टर यांची भेट घेणार आहेत. तसेच स्मोट्रिच मुंबई व गांधीनगर येथील GIFT सिटीचा दौराही करणार आहेत.

यापूर्वी भारत आणि इस्रायलमध्ये द्विपक्षीय गुंतवणूक कराराच्या मसुद्यावर प्राथमिक चर्चा झाली आहे. ही चर्चा यशस्वी ठरली असून दोन्ही देशांनी द्विपक्षीय गुंतवणूक करारावर सहमती दर्शवली आहे. यामुळे स्मोट्रिच यांच्या या भेटी भारत आणि इस्रायलमध्ये द्विपक्षीय करारावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

या द्विपक्षीय कराराचा उद्देश भारत आणि इस्रायलमध्ये आर्थिक सहकार्य वाढवणे आहे. तसेच या करारातून दोन्ही देशात मुक्त व्यापार करारा सहकार्य विकसित करणे देखील याचा हेतू आहे.

या करारामुळे भारत आणि इस्रायलमध्ये गुंतवणूकदारांना कायदेशीर सुरक्षा, स्थिरता आणि विश्वासार्हता मळेल. यामुळे दोन्ही देशांतील गुंतवणुकीवरील विवाद झाल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर सोडवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल.

गेल्या काही काळात भारत आणि इस्रायलमध्ये आर्थिक सहकार्याचे संबंध मजबूत होत आहेत. यामुळे द्विपक्षीय व्यापार करार आणि मुक्त व्यापार करारामुळे हे संबंध अधिक मजबूत होतील.

इस्रायलने आतापर्यंत १५ हून अधिक देशांसोबत द्विपक्षीय करार केले आहेत. यामध्ये संयुक्त अरब अमिराती (UAE),जपान, फिलिपिन्स, थायलंड, दक्षिण आफ्रिका अशा देशांचा समावेश आहे. यामुळे भारतासोबतचा करार इस्रायलच्या आर्थिक धोरणाला नवी दिशा देईल.

हेही वाचा :

नसांमधील चिकटलेला पिवळा कचरा फेकेल बाहेर, हार्ट अटॅकपासून वाचवतील 6 उपाय

ब्रेकिंग! छगन भुजबळ कोर्टात जाणार, मराठा आरक्षणाच्या नव्या जीआरला आव्हान?

भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठा गौप्यस्फोट…मॅच फिक्सिंगचं सत्य