‘बिग बॉस मराठी 6’विजेती तन्वी कोलतेकडे किती संपत्ती? कोकणकन्या किती कमावते?

मराठी मनोरंजन विश्वात सध्या बिग बॉस मराठी च्या सहाव्या पर्वातील विजेती म्हणून तन्वी कोलते हिचं नाव जोरदार चर्चेत आहे. आपल्या आत्मविश्वासपूर्ण आणि बेधडक खेळीच्या जोरावर तन्वीने प्रेक्षकांची मनं जिंकत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं आहे.

रत्नागिरीची रहिवासी असलेली तन्वी कोलते ही अभिनेत्री, मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून ओळखली जाते. (Bigg Boss Marathi)तिचा स्पष्टवक्तेपणा आणि धाडसी निर्णयक्षमता यामुळेच शोमध्ये तिला “धाकड गर्ल” अशी ओळख मिळाली. अंतिम फेरीत तिने राकेश बापट आणि विशाल कोटियन यांसारख्या मजबूत स्पर्धकांना मागे टाकत ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.

शैक्षणिकदृष्ट्या इंजिनिअर असलेल्या तन्वीने सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स मधून बी.टेक पूर्ण केलं. मात्र अभिनय आणि मॉडेलिंगची आवड तिला ग्लॅमर इंडस्ट्रीकडे घेऊन आली. ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली आणि ( Bigg Boss Marathi) त्यानंतर विविध म्युझिक व्हिडिओंमधूनही तिने आपली छाप सोडली. मॉडेलिंग क्षेत्रातही तन्वीने आपली वेगळी ओळख निर्माण केली असून ‘मिस रत्नागिरी 2018’ आणि ‘मिस गोवा 2020’ हे किताब तिच्या नावावर आहेत. या यशामुळेच तिला मनोरंजन क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी मजबूत पायाभरणी मिळाली.

‘बिग बॉस मराठी 6’ जिंकल्यानंतर तन्वीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. विजेतेपदासोबतच तिला 15 लाख रुपयांची रोख रक्कम आणि 10 लाख रुपयांचं डायमंड ज्वेलरी वाऊचर मिळालं. (Bigg Boss Marathi) सध्या तिची एकूण संपत्ती 58 ते 80 लाख रुपयांच्या दरम्यान असल्याची माहिती समोर येत आहे.या विजयानंतर तन्वी कोलतेच्या करिअरला नवी दिशा मिळाली असून आगामी काळात ती मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये झळकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा

हादरवणारी घटना; आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

कॅन्सरची सुरूवातीची लक्षणे कोणती?

आता मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश; मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय