IPL 2025 मध्ये पंजाब किंग्जच्या कामगिरीची दखल सर्वत्र घेतली गेली. संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला, जरी जेतेपद हातातून निसटले तरी चाहत्यांनी संघाचे कौतुक केले(Player). पंजाब किंग्जच्या मालकीण प्रीती झिंटा यांचीही यंदा प्रचंड चर्चा झाली. जवळपास प्रत्येक सामन्यात मैदानावर हजेरी लावणाऱ्या प्रीती झिंटाच्या जोशात प्रेक्षक भारावले.

मात्र, आता पंजाबचा अनुभवी खेळाडू(Player) संदीप शर्मा याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्याच्या मते, एका जुन्या सामन्यात प्रीती झिंटाने थेट ‘प्लेअर ऑफ द मॅच’ बदलवून दिला होता. संदीप म्हणतो,”बंगळुरूमध्ये झालेल्या सामन्यात मी विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल यांना बाद केले होते. पण त्या सामन्यात अक्षर पटेलला सामनावीर देण्याचा निर्णय झाला होता, कारण त्याने २५ धावा काढल्या आणि दोन विकेट्स घेतल्या होत्या. पण प्रीती झिंटाने रवी शास्त्रींना सांगून सामनावीर माझ्याकडे वळवला. मी स्वतः तिला ‘सँडी’ म्हणून रवी शास्त्रींशी बोलताना ऐकलं.”
याशिवाय संदीप शर्माने श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाच्या चर्चेवरही टीका केली. तो म्हणाला, “फक्त आयपीएलच्या अंतिम फेरीत संघ नेला म्हणून कोणी भारतीय संघाचा कर्णधार होतो असं नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट हे वेगळं आव्हान आहे. सूर्यकुमार यादव कधी आयपीएल संघाचा कर्णधार राहिलेला नाही, पण त्यामुळे तो भारताचा कर्णधार होऊ शकत नाही, असं होत नाही.”संदीपच्या या वक्तव्यामुळे प्रेक्षक आणि क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा :
IPS अधिकाऱ्यांची बूट पुसण्याची लायकी..,’ मिटकरींनी अंजना कृष्णांविरोधात
महिलेने आधी नग्न होऊन व्हिडिओ कॉल केला, नंतर शिक्षकानेही…
आयपीएस अंजना कृष्णा व्हिडीओ कॉल; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर