सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संवादाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यातील राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे(politics). या प्रकरणावर विरोधकांकडून अजित पवार यांच्यावर टीका होत असतानाच आता राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार समर्थक गटामध्येही आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.

अजित पवार यांनी स्वतः ट्विटरवर भूमिका स्पष्ट करताना म्हटलं की, “माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा नव्हता. परिस्थिती शांत राहावी, बेकायदेशीर कामांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी मी कटिबद्ध आहे. महिला अधिकारी आणि पोलीस दलाबद्दल मला सर्वोच्च आदर आहे.”
मात्र या घटनेवरून रोहित पवार यांनी मोठा दावा करत अजित पवार यांना “आपल्याच मित्रांकडून सापळा रचला जातोय” असा टोला लगावला आहे. त्यांनी म्हटलं, “शेतकरी कर्जमाफी, अवकाळी पावसाचं नुकसान असे खरे प्रश्न चर्चेत यायला हवेत. पण मित्रपक्षांकडूनच या प्रकरणाला वेगळं वळण देऊन अजितदादांना लक्ष्य केलं जात आहे(politics).”

राजकारणात चाललेल्या या वादामुळे करमाळा प्रकरण आता केवळ प्रशासनिक मर्यादेत न राहता राजकीय रंग चढलेला दिसत आहे. आगामी दिवसांत या मुद्द्यावर अजून संघर्ष रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा :
अरुण गवळी दगडी चाळीत आला, BMC निवडणुकीवर काय होणार परिणाम?
इलेक्ट्रिक वाहनांना 100 टक्के टोलमाफी….
अजित पवारांनी धमकी दिलेली ‘ती’ IPS अधिकारी कोण…