2007 सालच्या शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गँगस्टर-राजकारणी अरुण गवळी (७६) यांना जामीन मंजूर केला आहे. नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये तब्बल 18 वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर बुधवारी गवळी मुंबईच्या दगडी चाळीत परतला(elections).

मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये एकेकाळी दाऊद इब्राहिम, छोटा राजन, अमर नाईक यांच्याशी थेट भिडणारा गवळी पुन्हा प्रकाशझोतात आला आहे. आज अंडरवर्ल्डची ताकद पूर्वीसारखी नसली, तरी भायखळा परिसरात गवळीच्या नावाचा दरारा कायम आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, गवळीच्या सुटकेचे वेळापत्रक महत्त्वाचे आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. भायखळा मतदारसंघात सुमारे ३.५ लाख मतदार आहेत आणि हा भाग गवळीचा बालेकिल्ला मानला जातो. तुरुंगात असतानाही त्याची मुलगी गीता गवळीने सातत्याने महापालिका निवडणुका (elections)जिंकल्या आहेत.

अरुण गवळी यापूर्वी 2004 मध्ये चिंचपोकळी मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. त्याच्या अखिल भारतीय सेनेने महापालिकेत नेहमी शिवसेनेला साथ दिली होती. मात्र, आता शिवसेनेत दोन गट पडल्याने यंदाच्या निवडणुकीत गवळी कोणाला पाठिंबा देणार? याची उत्सुकता आहे.

भाजप-शिंदे गटाच्या महायुतीला गवळीची साथ मिळणार का, की उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीकडे तो झुकणार? हा प्रश्न सध्या दक्षिण मुंबईच्या राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे.

हेही वाचा :

अजित पवारांनी धमकी दिलेली ‘ती’ IPS अधिकारी कोण…
जलवाहिनीच्या खड्यात बुडून मुलाचा मृत्यू….
बायकोनं नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत लॉजवर पकडलं….