राज्याचे उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister)अजित पवार यांनी आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांना केलेला फोन कॉल आता वादाच्या भोवऱ्यात आहे. याचं कारण अजित पवारांनी अंजली कृष्णा यांच्याशी धमकीच्या स्वरात संवाद साधला. अजित पवारांना अंजली कृष्ण यांनी तुमची हिंमत कशी झाली? अशा शब्दांत झापलं. यानंतर अंजली कृष्णा नेमक्या कोण आहेत? अशी चर्चा रंगली आहे.

माढ्याच्या कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रारमिळाल्यानंतर करमाळ्याच्या पोलीस उपअधिक्षक अंजना कृष्णा या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. यादरम्यान नागरिक आणि अंजली कृष्णा यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता बाबा जगताप याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावला आणि अंजली कृष्णा यांच्या हातात दिला.
मात्र त्यांना अजित पवारांचा (Deputy Chief Minister)आवाज ओळखता आला नाही. अजित पवारांनी यावेळी दोनवेळा मी उपमुख्यमंत्री बोलत आहे असं सांगितलं. ‘मै DCM बोल रहा हू. ‘ये कारवाई बंद करो…मेरा आदेश हैं..’, असं अजित पवारांनी सांगितलं. त्यावर अंजली कृष्णा म्हणाल्या, “मेरे फौन पर कॉल करे”. त्यावर अजित पवार रागावून म्हणले की, “तुम पे अॅक्शन लूंगा.. इतनी डेरिंग है तुम्हारी. मेरा चेहरा तो पेहचानोगा ना”.

यानंतर अजित पवारांनी व्हिडीओ कॉल केला. त्यानंतर अंजली कृष्णा यांनी बांधावर जाऊन पवारांशी संवाद साधला. यावेळी अजित पवारांनी त्यांना कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. माझा फोन आला आहे, तहसीलदारांना सांगा असं पवार म्हणाले.
अंजली कृष्णा यांचं पूर्ण नाव अंजना कृष्णा व्हीएस आहे. त्या भारतीय पोलिस सेवा अधिकारी आहेत, ज्या सध्या महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात करमाळा येथे पोलिस उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या प्रामाणिक आणि कठोर कार्यशैलीसाठी त्या ओळखल्या जातात. 2022-23 मध्ये त्यांनी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी AIR-355 रँक मिळवला होता.

अंजली कृष्णा यांचा जन्म केरळमधील तिरुअनंतपुरम येथे झाला. त्यांचे वडील बिजू यांचा कपड्यांचा छोटा व्यवसाय आहे, तर आई सीना कोर्टात टायपिस्ट म्हणून काम करतात. त्यांचे प्राथमिक शिक्षण पूजापुरा येथील सेंट मेरीज सेंट्रल स्कूलमधून आणि उच्च शिक्षण तिरुअनंतपुरम येथील एचएचएमएसपीबी एनएसएस कॉलेज फॉर वुमनमधून झाले. अंजली कृष्णा यांची गणना कुशाग्र आणि प्रामाणिक आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये केली जाते.
अंजली कृष्णा या 2023 बॅचच्या भारतीय पोलिस सेवाअधिकारी आहेत, ज्या सध्या सोलापूर जिल्ह्यात करमाळा येथे पोलिस उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्या केरळमधील तिरुअनंतपुरम येथील असून, त्यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा 2022 मध्ये AIR-355 मिळवला. त्या त्यांच्या प्रामाणिक आणि कठोर कार्यशैलीसाठी ओळखल्या जातात.
2025 मध्ये सोलापूरच्या माढा तालुक्यातील कुर्डू गावात अवैध मुरूम उत्खननाविरुद्ध कारवाई करताना अंजली कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फोन आणि व्हिडीओ कॉलवर वाद झाला. स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते बाबा जगताप यांनी अजित पवारांना फोन लावून अंजली यांना दिला. अंजली यांनी पवारांचा आवाज ओळखला नाही आणि त्यांना त्यांचा नंबर देऊन कॉल करण्यास सांगितले, ज्यामुळे पवार संतापले आणि त्यांनी “इतनी डेरिंग है तुम्हारी?” असे म्हणत कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
अंजली कृष्णा यांनी स्थानिक तक्रारींवरून कुर्डू गावात रस्त्याच्या बांधकामासाठी होणाऱ्या अवैध मुरूम उत्खननावर कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या. गावकऱ्यांनी आणि NCP कार्यकर्त्यांनी याला विरोध केला. बाबा जगताप यांनी अजित पवारांना फोन लावला, ज्यांनी अंजली यांना कारवाई थांबवण्यास सांगितले. अंजली यांनी पवारांची ओळख निश्चित करण्यासाठी त्यांना थेट कॉल करण्यास सांगितले, ज्यामुळे वाद वाढला.
हेही वाचा :
जलवाहिनीच्या खड्यात बुडून मुलाचा मृत्यू….
बायकोनं नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत लॉजवर पकडलं….
मराठा आरक्षण जीआर नंतर ओबीसी नेत्यांमध्ये फूट…..?