केंद्र व राज्य सरकार गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रिक वाहनांच्या(vehicles) वापराला प्रोत्साहन देत आहेत. पर्यावरणपूरक वाहतूक वाढावी, पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी व्हावे आणि ग्राहकांचा खर्च वाचावा, यासाठी महाराष्ट्र सरकारने आता एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारने राज्यातील तीन प्रमुख महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी 100 टक्के टोलमाफी लागू केली आहे. हा निर्णय मोटार व्हेइकल अॅक्ट 1958 अंतर्गत घेण्यात आला असून, 22 ऑगस्ट 2025 पासून तो प्रभावी झाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेत M2, M3 आणि M6 श्रेणीतील चारचाकी इलेक्ट्रिक वाहने, तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या व खासगी कंपन्यांच्या इलेक्ट्रिक बसेसना टोल भरण्याची गरज राहणार नाही.

या निर्णयामुळे राज्यातील हजारो इलेक्ट्रिक वाहनधारकांना आर्थिक दिलासा मिळणार असून प्रवासाचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होईल. शिवाय, इलेक्ट्रिक वाहन खरेदीला चालना मिळेल, असे सरकारचे मत आहे. यामुळे वाहन निर्मिती उद्योगातही वाढ होईल आणि पर्यावरणपूरक वाहतूक अधिक प्रमाणात प्रचलित होईल, असा विश्वास राज्य सरकारने व्यक्त केला आहे. वाहनधारकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. सरकारच्या या उपक्रमामुळे आमचे दरवर्षीचे हजारो रुपये टोलमध्ये वाचतील, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

इलेक्ट्रिक वाहनांचा(vehicles) सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रदूषण कमी होणे. ही वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर अवलंबून नसल्यामुळे इंधनखर्चही वाचतो. तसेच, इलेक्ट्रिक वाहनांमुळे ध्वनीप्रदूषण आणि वायूप्रदूषण दोन्ही कमी होते. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी अशा वाहनांचा वापर करावा, असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे.

हेही वाचा :

अजित पवारांनी धमकी दिलेली ‘ती’ IPS अधिकारी कोण…
जलवाहिनीच्या खड्यात बुडून मुलाचा मृत्यू….
बायकोनं नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत लॉजवर पकडलं….