जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 54 वर्षीय शिक्षकाला नग्न व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीने ब्लॅकमेल करण्यात आले. यामध्ये शिक्षकाकडून एक लाख 15 हजार 350 रुपये उकळण्यात आल्याचा आरोप आहे. बारामती तालुक्यात हा प्रकार घडला आहे(woman).याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी अभिषेक विठ्ठल पांचाळ (रा.चाकण, मूळ रा. उदगीर, जि. लातूर) आणि सिद्धांत माधव गगनभिडे (रा. चाकण, मूळ रा. पाटोदा बुद्रुक, जि. लातूर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मे 2025 मध्ये पीडित शिक्षकाला एका महिलेच्या(woman) नावाने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरु झाले आणि इन्स्टाग्रामवरही संपर्क वाढला. काही दिवसांनी त्या अकाउंटवरून नग्नावस्थेतील महिलेने व्हिडिओ कॉल केला. इतक्यावरच न थांबता तिने शिक्षकाला कपडे उतरवण्यास भाग पाडले.शिक्षकाने नकार दिल्यावर चॅटिंग आणि व्हिडिओ कॉलचे स्क्रीनशॉट व्हायरल करण्याची धमकी दिली. भीतीपोटी शिक्षकाने धमकीला बळी पडत कपडे काढले. त्यानंतर अभिषेक पांचाळ याने शिक्षकाला फोन करून त्यांचे नग्न फोटो आणि व्हिडिओ व्हॉट्सअपवर पाठवले.
दरम्यान, दोन लाख रुपये द्या, नाहीतर व्हिडिओ व्हायरल करुन नोकरी धोक्यात टाकण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली. समाजात बदनामीच्या भीतीने शिक्षकाने काही रक्कम पाठवली. पांचाळने सिद्धांतच्या फोन पे खात्यावर 30 हजार आणि 7 जुलैला 70 हजार रुपये उकळले. 29 ऑगस्टला पुन्हा एक लाखाची मागणी करत गावात येऊन धमकी दिली. शिक्षकाने हा प्रकार पुतण्याला सांगितल्यानंतर पोलिसांत फिर्याद दिली.राज्यातील तब्बल ७२ वरिष्ठ सरकारी अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याचा धक्कादायक दावा एका राजकीय नेत्याने काही दिवसांपूर्वी केला. सध्या नाशिक दौऱ्यावर असलेल्या या नेत्याने पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना हा गौप्यस्फोट केला होता. या खुलाशामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर आता बारामतीत हनीट्रॅपचे प्रकरण समोर आली.
हेही वाचा :
आयपीएस अंजना कृष्णा व्हिडीओ कॉल; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर
गणरायाच्या विसर्जनात मोराची सरप्राईज एन्ट्री, Watch Video
गणपती मंडपात अश्लील डान्स करणाऱ्या तरुणींचा व्हिडिओ व्हायरल