मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; स्थानकांवर प्रवाशांची गर्दी

मध्य रेल्वेची वाहतूक आज (traffic)सकाळपासून मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली असून, कामकाजाच्या वेळेतच अनेक गाड्या उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तांत्रिक बिघाडामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

काही महत्त्वाच्या मार्गांवरील (traffic)लोकल गाड्या १५ ते ३० मिनिटे उशिराने धावत असल्याने कार्यालयीन वेळेत प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली.मुंबईतील प्रमुख स्थानकांवर सकाळपासूनच प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

अनेक ठिकाणी प्लॅटफॉर्मवर (traffic)उभे राहण्यासाठीही जागा नसल्याचे चित्र होते. गर्दीमुळे काही प्रवाशांनी संताप व्यक्त केला तर काहींनी पर्यायी वाहतुकीचा मार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न केला. मात्र, अचानक वाढलेल्या प्रवासी संख्येमुळे बस आणि रस्ते वाहतुकीवरही ताण पडला.रेल्वे प्रशासनाकडून बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, लवकरच वाहतूक सुरळीत करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. दरम्यान, प्रवाशांना शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.