उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अनेक कार्यक्रमांमध्ये, विशेषतः धार्मिक आयोजनांमध्ये, ऑर्केस्ट्रा आणि डान्स कार्यक्रम आयोजित केले जातात. अशा कार्यक्रमांमुळे अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. आता असाच एक नवीन वाद गुजरातमधून समोर आला आहे, जिथे गणपती मंडापामध्येच भोजपुरी गाण्यांवर अश्लील डान्स करण्यात आला. याचा व्हिडिओ(Video) सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

हा प्रकार गुजरातमधील अंकलेश्वर येथील मीरानगरमधील गणेश मंडाळामध्ये घडला. गणपतीची मूर्ती बसवल्यानंतर तिथे ऑर्केस्ट्रा आणि डान्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महिला नृत्यांगनांनी भोजपुरी गाण्यांवर अश्लील डान्स केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत अनेकांनी कारवाईची मागणी केली.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये(Video) मीरानगर येथील गणपती पंडालसमोर महिला नर्तकी भोजपुरी गाण्यांवर अश्लील नृत्य करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेक भक्त नाराज झाले आणि त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. आयोजकांनी माफी मागितली असली तरी, या घटनेमुळे धार्मिक सलोख्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर पोलीस काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
गुजरात के अंकलेश्वर के मीरानगर स्थित गणेश पंडाल में भोजपुरी गाने में ठुमके लगवाए गए. इसके खिलाफ शिकायत दर्ज करवा दी गई.
— Avinash Tiwari (@TaviJournalist) September 5, 2025
फिर क्या आयोजकों ने माफी मांग ली है !
ऐसा हर जगह होना चाहिए, जहां धार्मिक आयोजन में इस तरह के कांड हों, तुरंत विरोध किया जाना चाहिए, ये कतई ठीक नहीं है pic.twitter.com/Q2CMCvWewY
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंकलेश्वर गणपती चॅरिटेबल ट्रस्टने या कार्यक्रमाच्या आयोजकांविरुद्ध जीआयडीसी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. ट्रस्टने म्हटले आहे की, अशा कार्यक्रमांमुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत आणि पोलिसांनी यावर कठोर कारवाई करावी.
या घटनेनंतर आयोजकांनी माफी मागितली आहे. सत्यम कुमार नावाच्या आयोजकाने सांगितले की, “आमच्या गणेश मंडळामध्ये जे काही घडले, त्याबद्दल आम्ही माफी मागतो. भविष्यात असा कोणताही कार्यक्रम आयोजित करणार नाही, ज्यामुळे कोणाच्याही भावना दुखावतील.” त्यांनी हात जोडून लोकांची माफी मागितली आहे.
हेही वाचा :
अरुण गवळी दगडी चाळीत आला, BMC निवडणुकीवर काय होणार परिणाम?
इलेक्ट्रिक वाहनांना 100 टक्के टोलमाफी….
अजित पवारांनी धमकी दिलेली ‘ती’ IPS अधिकारी कोण…