प्रत्येक माणसाला काही ना काही छंद असतो, आणि तो त्या छंदासाठी आपल्या परीने वेळ, पैसा आणि मेहनत खर्च करतो. काहींना प्रवासाची आवड असते, आणि या आवडीतून ते महागड्या गाड्या, बोटी किंवा अगदी खास ऑर्डरने तयार केलेल्या वस्तू खरेदी करतात. पण कल्पना करा, आपण लाखो रुपये खर्च करून काहीतरी विकत घेतलं आणि ते काही वेळातच बिघडलं तर? अशीच काहीशी हृदयद्रावक घटना एका व्यक्तीच्या बाबतीत घडली आहे. याचा व्हिडिओ(Video) आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून यातील दृश्यांनी आता सोशल मीडिया युजर्स हादरून गेले आहेत.

टायटॅनिक जहाजाविषयी तुम्ही अनेकदा ऐकले किंवा चित्रपटात पाहिले असेल. हा पूर्वीच्या काळचा एक लग्झरी जहाज होता जो पाण्यात बुडाला. ही त्याकाळची एक मोठी घटना होती कारण यात अनेक प्रवाशांनी आपला जीव देखील गमावला होता आणि आता अशीच काहीशी घटना इंटरनेटवर शेअर करण्यात आली आहे, ज्यात पुन्हा एकदा एक लग्झरी जहाज पाण्यात बुडताना दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये(Video) एक नवंकोर, प्रचंड आणि महागडं लक्झरी जहाज (नौका) समुद्रात प्रथमच उतरवलं जातं.

जहाज अतिशय भव्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सजलेलं दिसतं. लाँच केल्यानंतर जहाज काही अंतरापर्यंत व्यवस्थित चालतं, पण अचानक काही तांत्रिक बिघाडामुळे ते एका बाजूला झुकायला लागतं. काही क्षणांतच ते झुकत झुकत पाण्यात बुडायला लागतं. विशेष म्हणजे, जहाज बुडताना त्याच्या एका कोपऱ्यात एक व्यक्ती लाईफ जॅकेटसह उभा दिसतो. अखेर त्याला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारावी लागते.

हा व्हिडीओ @_fluxfeeds या एक्स हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की या नौकेची किंमत १ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (अंदाजे ८ कोटी रुपये) होती आणि ती लाँच केल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांतच समुद्रात बुडाली. या व्हिडीओला ४२ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी कमेंट्समध्ये या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “बोट फक्त १ दशलक्ष असण्याची शक्यता शून्य टक्के आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला आशा आहे की त्यांच्याकडे चांगला विमा असेल”. ही घटना फक्त एका नौकेच्या बुडण्यापुरती मर्यादित नाही, तर ती आपल्याला शिकवण देते की कितीही महाग वस्तू असली, तरी तिचं योग्य नियोजन आणि तपासणी झाली नाही, तर तो खर्च व्यर्थ ठरू शकतो.

हेही वाचा :

महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळी मोठी भरती

विवाहित पुरुषांच्या प्रेमात का पडतात मुली? 5 महत्त्वाची कारणे

राजकीय नात्यांचा उत्सव कधी दिवाळी, कधी शिमगा