रेल्वे स्थानकाला RPF जवानांचा सुरक्षा कवच; हरवलेल्या ४१२ मुलांना केले पालकांकडे सुपूर्त

रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) कडून राबविण्यात येणाऱ्या ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ या मोहिमेअंतर्गत पुणे रेल्वे विभागाने गेल्या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. (Railway) या कालावधीत हरवलेल्या, पळून गेलेल्या आणि भरकटलेल्या तब्बल ४१२ मुलांची सुटका करून त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. घरगुती वाद, कौटुंबिक तणाव, तसेच मोठ्या शहरातील आकर्षणामुळे घर सोडून जाणाऱ्या मुलांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे परत आणण्याचे काम या मोहिमेद्वारे सातत्याने केले जात आहे.

अनेकदा किरकोळ कारणांवरून मुले रागाच्या भरात घर सोडून रेल्वेने दूरच्या शहरात पोहोचतात. मात्र, परिस्थितीची जाणीव झाल्यानंतर त्यांना परत जाण्याचा मार्ग सापडत नाही आणि चुकीच्या संगतीत जाण्याचा धोका वाढतो. (Railway)अशा मुलांना शोधून काढण्यासाठी आरपीएफकडून रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष ठेवले जाते. जवान मुलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेतात, त्यांचे समुपदेशन करतात आणि त्यांना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवतात. या मोहिमेत स्वयंसेवी संस्थांचाही सक्रिय सहभाग असून दर महिन्याला सुमारे ३५ ते ४० मुलांना त्यांच्या घरी परत पाठवले जाते.

या कारवाईत सुटका करण्यात आलेल्या ४१२ मुलांमध्ये ३५५ मुलगे आणि ५७ मुलींचा समावेश आहे. अनेक मुलांना मानवी तस्करीसारख्या गंभीर धोक्यांपासून वाचवण्यातही यश आले आहे. हेमंतरुमार बेहेरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात येणारी अनेक मुले रेल्वे स्थानकांवरच आश्रय घेतात, त्यामुळे अशा ठिकाणी शोधमोहीम राबवून त्यांना सुरक्षितपणे परत आणले जाते.

दरम्यान, पुणेकरांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. वाराणसी या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राशी थेट रेल्वे जोडणी मजबूत करण्यासाठी नवीन ‘अमृत भारत’ एक्सप्रेसला मंजुरी देण्यात आली आहे. हडपसर (पुणे) ते बनारस (वाराणसी) दरम्यान ही नवी रेल्वे सुरू होणार असून,(Railway) सध्या धावणारी पुणे-जबलपूर स्पेशल ट्रेनही नियमित करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

हेही वाचा

आता मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश; मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय

हादरवणारी घटना; आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

कॅन्सरची सुरूवातीची लक्षणे कोणती?