सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी भारतीय टपाल विभाग अंतर्गत चालवली जाणारी ‘किसान विकास पत्र’ योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. निश्चित परतावा आणि सरकारी हमीमुळे ही योजना सध्या विशेष आकर्षण ठरत असून, कमी जोखीम असलेल्या गुंतवणुकीकडे वळणाऱ्यांसाठी हा पर्याय फायदेशीर मानला जात आहे.

केंद्र सरकारच्या या छोट्या बचत योजनेत गुंतवलेली रक्कम ठराविक कालावधीत दुप्पट होते, (Post Office) हेच तिचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. सध्याच्या नियमानुसार, ७.५ टक्के वार्षिक व्याजदराने गुंतवणूक केलेली रक्कम ११५ महिन्यांत म्हणजेच सुमारे ९ वर्षे ७ महिन्यांत दुप्पट होते. चक्रवाढ पद्धतीने व्याजाची गणना होत असल्याने गुंतवणूकदारांना दीर्घकालीन फायदा मिळतो.
या योजनेत केवळ १,००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते आणि कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. (Post Office )त्यामुळे आपल्या आर्थिक क्षमतेनुसार कोणीही मोठी रक्कम यात गुंतवू शकतो. उदाहरणार्थ, ५ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर मुदत पूर्ण झाल्यावर ती १० लाखांपर्यंत वाढते, तर ७ लाख रुपयांवर सुमारे १४ लाखांचा परतावा मिळू शकतो.
योजनेत एकाच व्यक्तीला अनेक खाती उघडण्याची मुभा आहे. तसेच संयुक्त खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध असून, १० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या नावानेही खाते सुरू करता येते. (Post Office) याशिवाय, एका पोस्ट ऑफिसमधील खाते दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये सहज हस्तांतरित करण्याची सोयही देण्यात आली आहे.
भविष्यातील गरजा लक्षात घेऊन सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी ‘किसान विकास पत्र’ ही योजना एक विश्वासार्ह पर्याय म्हणून समोर येत आहे. मात्र, गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित नियम आणि व्याजदरांची अधिकृत माहिती तपासणे आवश्यक असून, तज्ज्ञांचा सल्ला घेणेही महत्त्वाचे ठरते.
हेही वाचा
आता मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश; मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय
हादरवणारी घटना; आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार