सणासुदीच्या काळात सोन्या(gold)-चांदीच्या किमतीत चढ-उतार होणे ही काही नवीन बाब नाही. पण यंदा गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळी या सलग सणांच्या पार्श्वभूमीवर सोन्याने मोठी झेप घेतली आहे. आठवड्याच्या सुरुवातीच्या चार दिवसांत सोन्याने तब्बल 2000 रुपयांपेक्षा जास्त वाढ केली होती. चांदीनेही सुरुवातीला भरारी घेतली, मात्र GST परिषदेच्या निर्णयानंतर चांदीची गती मंदावली.

सोन्याची झेप :
4 सप्टेंबरला GST परिषदेच्या निर्णयानंतर एका दिवसासाठी सोने(gold) स्वस्त झाले होते. पण लगेचच 5 सप्टेंबरला सोन्याने तब्बल 760 रुपयांची झेप घेतली. मागील काही दिवसांत सोन्याचा दर 10 ग्रॅमला 2000 रुपयांनी वाढला आहे.

IBJA च्या आज सकाळच्या दरानुसार,

24 कॅरेट सोने: ₹1,06,340

23 कॅरेट सोने: ₹1,05,910

22 कॅरेट सोने: ₹97,410

18 कॅरेट सोने: ₹79,750

14 कॅरेट सोने: ₹62,210

विशेष म्हणजे दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव सव्वा लाखांच्या घरात पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चांदीत पडझड :
आठवड्याच्या सुरुवातीला चांदीने सलग चार दिवसांत ₹2,100 ची भरारी घेतली होती. पण GST परिषदेच्या बैठकीनंतर तिची गती थंडावली. त्यानंतर चांदीत ₹1,100 ची घसरण झाली असून आज सकाळच्या सत्रात चांदी पुन्हा ₹100 ने घसरली.

सध्याचा दर: ₹1,25,900 प्रति किलो (गुडरिटर्न्सनुसार)

IBJA दर: ₹1,23,170 प्रति किलो

तज्ज्ञांच्या मते, दिवाळीच्या आधी चांदीही पुन्हा एकदा मोठी झेप घेऊ शकते.

आंतरराष्ट्रीय आणि वायदे बाजारात कर किंवा शुल्क नसल्याने दर काहीसे कमी असतात, तर सराफा बाजारात कर आणि शुल्कामुळे किंमतीत फरक दिसतो. सणासुदीमुळे मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचा कलही सोने आणि चांदीकडे वाढताना दिसतो.

हेही वाचा :

झोपल्यानंतर सतत हातापायांमध्ये मुंग्या येतात?

आता Fortuner खरेदी करण्याचे स्वप्न होईल पूर्ण! 

आगामी निवडणुकांसाठी भाजपचा मास्टरप्लॅन; तीन शिलेदार मैदानात