जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत सामान्य (gst)नागरिकांना दिलासा देणारे मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. पाहा कोणत्या वस्तूंवरील जीएसटी कमी झाला आणि काय स्वस्त होणार.

जीएसटी कौन्सिलने सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. रोजच्या वापरातील अनेक वस्तूंवरील जीएसटीमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे, (gst)तसेच काही वस्तू करमुक्त करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन नवे जीएसटी स्लॅब, 5% आणि 18% जाहीर केले आहेत. 22 सप्टेंबरपासून कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत, याची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे आहे.
या वस्तूंवर कोणताही जीएसटी नाही
सर्व व्यक्तिगत जीवन विमा पॉलिसी: टर्म लाइफ, युलिप किंवा एंडोमेंट पॉलिसी या सर्व पॉलिसींवरील जीएसटी हटवण्यात आला आहे.
दूध, पनीर, ब्रेड: अल्ट्रा-हाई टेंपरेचर दूध, छेना आणि पनीरसह सर्व प्रकारच्या भारतीय ब्रेडवर आता कोणताही कर लागणार नाही.
जीवनरक्षक औषधे: 33 प्रकारच्या जीवनरक्षक औषधांवरील जीएसटी 12% वरून शून्य करण्यात आला आहे.
‘या’ वस्तू होतील स्वस्त
सिमेंट: सिमेंटवरील जीएसटी 28% वरून 18% करण्यात आला आहे.
खाद्य पदार्थ: नमकीन, भुजिया, सॉस, पास्ता, इन्स्टंट नूडल्स, चॉकलेट, कॉफी, कॉर्नफ्लेक्स, लोणी, तूप यांसारख्या वस्तूंवर आता 5% जीएसटी लागेल.
ऑटोमोबाईल:
350 सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या लहान कार आणि मोटरसायकलवरील जीएसटी 28% वरून 18% झाला आहे.
बस, ट्रक आणि रुग्णवाहिकेवरील जीएसटी 28% वरून 18% करण्यात आला आहे.
सर्व ऑटो पार्ट्सवर आता 18% एकसमान दर लागू होईल. तीन चाकी वाहनांवरील जीएसटी 28% वरून 18% झाला आहे.
छोटे डिझेल वाहन: 1500 सीसी पर्यंतच्या आणि 4000 मिमी पेक्षा कमी लांबीच्या डिझेल कारवर जीएसटी 28% वरून 18% झाला आहे.
इलेक्ट्रॉनिक वस्तू:
एसी, डिशवॉशर, दूरदर्शन, मॉनिटर, प्रोजेक्टर आणि सेट-टॉप बॉक्स यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरील जीएसटी 28% वरून 18% करण्यात आला आहे.
इतर वस्तू:
सुकामेवा: बदाम, काजू, पिस्ता, खजूर यांवरील कर 12% वरून 5% झाला आहे.
पादत्राणे आणि कपडे: आता या वस्तूंवर 5% जीएसटी लागेल, जो आधी 12% होता.
खेळ साहित्य, खेळणी, चामड्याच्या वस्तू आणि हस्तकला वस्तूंवर 5% जीएसटी लागू करण्यात आला आहे.
नूतनीकरणक्षम ऊर्जा उपकरणे: बायोगॅस, पवनचक्की, सौर कुकर, सौर जल हीटर यांवरील जीएसटी 12% वरून 5% करण्यात आला आहे.
सिगारेट, गुटखा आणि तंबाखू उत्पादनांवर 40% कर
पान मसाला, सिगारेट, गुटखा आणि तंबाखूच्या इतर उत्पादनांवर 40% कर लागू होईल. याशिवाय, अतिरिक्त साखर किंवा इतर गोड पदार्थ असलेली पेये, चहा, कॉफी तसेच गैर-अल्कोहोलिक पेयांवरही 40% कर लागू होईल.
हेही वाचा :
काळी दिसते, म्हणून पत्नीला कपडे काढायला लावले, मग तिच्या शरीरावर…
विराट कोहलीच्या फिटनेस टेस्टबाबत मोठी अपडेट
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काय कराल? आवश्यक कागदपत्रं व पद्धत..