करोडपती होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी शेअर बाजारातील म्युच्युअल फंड SIP हा सुरक्षित आणि स्मार्ट मार्ग ठरू शकतो. छोट्या रकमेपासून सुरू केलेली गुंतवणूक(investment) दीर्घकाळानंतर मोठ्या रकमेत रूपांतरित होऊ शकते.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, जर एखाद्या व्यक्तीने दरमहा 2 हजारांची SIP सुरू केली, तर 32 वर्षांच्या कालावधीत त्यातून तब्बल 1 कोटी 1 लाख 45 हजार रुपयांचा फंड तयार होऊ शकतो. यामध्ये गुंतवलेली (investment)मूळ रक्कम फक्त 7.68 लाख रुपये असून उर्वरित संपूर्ण रक्कम कंपाऊंड रिटर्नमधून मिळते.
10 वर्षे गुंतवणुकीनंतर: अंदाजे ₹4.65 लाख
20 वर्षे गुंतवणुकीनंतर: अंदाजे ₹19.86 लाख
30 वर्षे गुंतवणुकीनंतर: अंदाजे ₹80.95 लाख
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, दरमहा जितकी जास्त रक्कम SIP मध्ये गुंतवली जाते, तितक्या लवकर करोडपती होण्याचा मार्ग खुला होतो. उदाहरणार्थ, दरमहा ₹5,000 ची गुंतवणूक केली तर फक्त 24 वर्षांतच 1 कोटींचा फंड उभारता येतो.महत्त्वाचे म्हणजे, गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य फंडाची निवड, नियमित समीक्षा आणि दीर्घकालीन दृष्टी ठेवणे आवश्यक आहे.
हेही वाचा :
काळी दिसते, म्हणून पत्नीला कपडे काढायला लावले, मग तिच्या शरीरावर…
विराट कोहलीच्या फिटनेस टेस्टबाबत मोठी अपडेट
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काय कराल? आवश्यक कागदपत्रं व पद्धत..