नेपाळ सरकारने फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, यूट्यूबसह 26 सोशल मीडिया(social media) प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशातील तरुणाई संतप्त झाली आहे. 3 सप्टेंबरपासून लागू झालेल्या या बंदीविरोधात आज हजारो तरुणांनी काठमांडूमध्ये संसद भवनाबाहेर मोठं आंदोलन छेडलं. सरकारच्या निर्णयामुळे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असल्याची भावना तरुणांनी व्यक्त केली.

संसदेत घुसले आंदोलक :
हजारोंच्या संख्येने जमलेल्या निदर्शकांनी थेट संसद भवनाच्या गेट क्रमांक 1 आणि 2 वर कब्जा केला. यावेळी परिस्थिती बेकाबू झाल्याने पोलिसांनी लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याची फवारणी केली. संघर्षादरम्यान किमान 5 आंदोलकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, शेकडो तरुण जखमी झाल्याची भीती व्यक्त होत आहे.

हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर काठमांडूमध्ये रात्री 10 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. यासोबतच राष्ट्रपती भवन, उपराष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान निवासस्थानाजवळ सैन्य तैनात करण्यात आले आहे. पोलिसांच्या मते, सुमारे 12 हजार निदर्शक रस्त्यावर उतरले होते. परिस्थिती गंभीर होत असल्याने सरकारने आपत्कालीन सुरक्षा बैठक बोलावली आहे.

सोशल मीडिया बॅन का झाला? :
नेपाळच्या दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सांगितले की, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबसह अनेक प्लॅटफॉर्मने सरकारी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली नव्हती. त्यांना 28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र अंतिम तारखेपर्यंत नोंदणी न केल्याने 26 सोशल मीडिया(social media) प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली.

बंदीच्या यादीत कोणते प्लॅटफॉर्म?
मेटा अॅप्स: फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप

व्हिडिओ/इमेज शेअरिंग: यूट्यूब, स्नॅपचॅट, पिंटरेस्ट

नेटवर्किंग/बातम्या: ट्विटर (X), लिंक्डइन, रेडिट

इतर अॅप्स: डिस्कॉर्ड, क्वोरा, टम्बलर, थ्रेड्स, वीचॅट, क्लबहाऊस, मास्टोडॉन, रंबल, मीवी, VK, लाइन, इमो, झालो, सोल, बोटिम, हॅम्रो पॅट्रो

याशिवाय, टेलिग्रामवर जुलै 2025 मध्येच बंदी आणण्यात आली होती.

हेही वाचा :

भारत-इस्रायलमध्ये होणार मोठा अर्थिक करार! टॅरिफ वादाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्पला 420 चा करंट

सरसकट ओबीसींची मागणी स्वीकारलेली नाही…; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टचं सांगितलं

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटलांच्या नावाची चर्चा