2 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणारा दसरा आणि नवरात्र(Navratri) सण भारतभर उत्साहाने साजरा केला जाईल. या सणांच्या काळात देशभरात सांस्कृतिक कार्यक्रम आणि उत्सवांचे आयोजन होत असून, शाळा आणि महाविद्यालयांना दीर्घकालीन सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळेल. नुकतेच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यी गणपतीच्या सुट्ट्यांचा आनंद घेऊन शाळेत परतले आहेत. दरम्यान नवरात्रीच्या काळात नऊ दिवसांची सुट्टी कोणाला मिळेल? सविस्तर जाणून घेऊया.

सुट्टीचा कालावधी
देशातील अनेक राज्यांमध्ये नवरात्रीपासून(Navratri) दसऱ्यापर्यंत (अष्टमी ते विजयादशमी) साधारण 9 ते 10 दिवसांच्या सुट्ट्या असतील. काही राज्यांमध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून, तर काही ठिकाणी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून शाळा बंद राहतील. याबाबत प्रत्येक राज्याच्या शिक्षण मंडळाने स्वतंत्र अधिसूचना जारी केल्या आहेत.
कोणत्या राज्यांमधे सुट्ट्या?
उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड यांसारख्या राज्यांमध्ये दसऱ्याच्या निमित्ताने शाळा आणि महाविद्यालयांना 9 दिवसांच्या सुट्ट्या जाहीर झाल्या आहेत. पश्चिम बंगालमध्येही नवरात्रीपासून दसऱ्यापर्यंत शैक्षणिक संस्था बंद राहतील. सुट्ट्यांचा निर्णय हा शाळा आणि स्थानिक प्रशासन मिळून घेत असते. त्यामुळे सुट्ट्या घेण्याआधी शाळेशी संपर्क साधा.
विद्यार्थ्यांसाठी संधी
या दीर्घ सुट्ट्या विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक सहभागासह अभ्यास आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त ठरतील. विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि मनोरंजन यांचा समतोल राखून कमकुवत विषयांवर लक्ष केंद्रित करावे, असे शिक्षक आणि पालकांना सुचवण्यात आले आहे. या सुट्ट्या विद्यार्थ्यांना ताजेतवाने होण्याची आणि स्व-अभ्यासाद्वारे प्रगती करण्याची संधी देतात. पालकांनी मुलांना दिनचर्या राखण्यास आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन द्यावे, जेणेकरून शाळा सुरू झाल्यावर त्यांना कोणतीही अडचण येऊ नये.
नवरात्र आणि दुर्गापूजेच्या सुट्ट्या
सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, 22 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होईल. 29 सप्टेंबरला महासप्तमी आणि 30 सप्टेंबरला महाअष्टमी साजरी होईल. पश्चिम बंगाल, त्रिपुरा, आसाम, बिहार, झारखंड, ओरिसा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात या दिवशी सुट्ट्या असण्याची शक्यता आहे. दसऱ्याची सुट्टी मात्र ऑक्टोबरमध्ये येईल.
रविवार आणि लांबलचक वीकेंड
सप्टेंबर 2025 मध्ये 7, 14, 21 आणि 28 तारखेला रविवारच्या सुट्ट्या असतील. याशिवाय, ईद आणि दुर्गापूजेच्या सुट्ट्या रविवारसोबत जोडल्या गेल्यास लांब वीकेंडचा आनंद विद्यार्थ्यांना मिळू शकतो. या सुट्ट्यांमुळे विद्यार्थ्यांना उत्सव साजरे करण्यासोबतच विश्रांतीचा आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा उत्तम अवसर मिळणार आहे.
हेही वाचा :
सोशल मीडिया बंदीवरून उद्रेक, 5 आंदोलकांचा मृत्यू
सुनेने केली सासूची हत्या; हत्येचे कारण समजल्यावर पोलिसांनी लावला डोक्याला हात
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटलांच्या नावाची चर्चा