सुनेने सासूची हत्या केल्याची खळबळजनक घटना नाशिकमध्ये घडली आहे. पोलिसांनी सुनेला अटक केली आहे. पोलिसांच्या तपासात या सुनेने सासूची हत्या(murder) का केली याचे कारण समोर आले आहे. सुनेने हत्या कारण्यामागे जे कारण सांगितले ते समजल्यावर पोलिसांनी डोक्याला हात लावला. या हत्या प्रकरणाची नाशिकमध्ये जोरदार चर्चा आहे.

नाशिकच्या दळलेली कॅम्प परिसरात ही घटना घडली आहे. सुनेने 89 वर्षीय सासूचा गळा दाबून तिची हत्या केली. या घटनेने खळबळ उडाली असून नाशिक रोड पोलिसांनी सुनेला अटक केली आहे. ही घटना 2 सप्टेम्बर रोजी घडली.
मृत सकीना गफार शेख (८९) यांना खाण्यासाठी विड्याचे पान आणावे, असे सकीना यांच्या दिराने आरोपी शबाना यांना सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून सासू आजारी असल्याने शबाना कंटाळल्या असल्याची माहितीही पुढे आली आहे. त्यातूनच शबानाने पान आणून देण्यास नकार दिल्याने सासू-सुनेमध्ये जोरदार वादावादी झाली. संतापाच्या भरात शबाना यांनी सासू सकीना यांचा गळा दाबला.
अस्वस्थ सकीना यांना नाशिकरोड येथे बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र दुसऱ्या दिवशी त्या मयत झाले. सुनेने सासूला खाण्यासाठी पान आणून न दिल्याने झालेल्या वादातून सुनेने सासूचा गळा आवळून ठार मारल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी शबाना यांच्याविरोधात गुन्हा(murder) दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असून आरोपी शबाना अब्दुल अजीज शेख यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
82 वर्षीय पतीकडून पत्नीची गळा चिरून हत्या , त्यानंतर स्वतःचाही आत्महत्येचा प्रयत्न
मुलाच्या अंगावर आजार ग्रस्त आई-वडिलांचा त्रास नको यासाठी एका 82 वर्षीय वृद्धाने पत्नीचा धारदार चाकूने गळा चिरून स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेने एकच खळब उडाली आहे. वसईच्या सांडोर परिसरातील कराडी वाडी येथे शनिवारी रात्री ही घटना घडली. अर्पिना परेरा (७४) अस मयत पत्नीचे नाव असून ग्रेबिएल परेरा (८२) असे पतीचे नाव आहे. हे जोडपे त्यांचा 51 वर्षीय मुलगा ब्रुनो, त्याची पत्नी आणि त्यांच्या मुलांसोबत राहत होते.
दोघेही दांपत्य वयोवृद्ध असल्याने अनेक वर्ष आजाराची झुंजत होते. याच नैराश्यात येऊन घरी कोणी नसताना पती ग्रॅबीएल याने पत्नीची गळा चिरून हत्या(murder) केली. त्यानंतर चाकूने स्वतःवर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मुलगा व सून घराबाहेर गेले होते ते पुन्हा घरी परतल्यानंतर त्यांना आई बेडरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात दिसली तर वडील जखमी अवस्थेत दिसले त्यानंतर या दोघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी अर्पिणा हिला मृत घोषित केले होते. तर, जखमी ग्राबिएलवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत..पोलिसांनी वसई पोलीस ठाण्यात यासंदर्भात हत्येचा गुन्हा नोंद केला आहे. आजार ग्रस्त आई-वडिलांचा मुलाला त्रास नको यासाठी हे पाऊल उचलल्याचे पोलिस तपासात समोर आले.
हेही वाचा :
भारत-इस्रायलमध्ये होणार मोठा अर्थिक करार! टॅरिफ वादाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्पला 420 चा करंट
सरसकट ओबीसींची मागणी स्वीकारलेली नाही…; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टचं सांगितलं
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटलांच्या नावाची चर्चा