वसईत 82 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने(grandfather) आपल्या पत्नीचा गळा चिरून हत्या केल्यानंतर, आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. आपल्या आजारांमुळे त्यांच्या मुलांना त्रास होत असून, त्यांना शांततेत जगता येत नाही अशी खंत असल्यानेच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

वसई पश्चिमेकडील कराडीवाडी येथे शनिवारी रात्री ही घटना घडली. मृताची ओळख अर्पिना गॅब्रिएल परेरा (74) आणि पती गॅब्रिएल फ्रान्सिस परेरा (82) अशी झाली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅब्रिएल यांनी स्वयंपाकघरातील चाकूने पत्नीचा गळा चिरून नंतर गळा, हात आणि पोट कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जोडपे त्यांचा 51 वर्षीय मुलगा ब्रुनो, त्याची पत्नी आणि त्यांच्या मुलांसोबत राहत होते. पोलिसांनी सांगितलं आहे की, शनिवारी संध्याकाळी ब्रुनो, त्याची पत्नी आणि मुलगी एका नातेवाईकाला भेटायला गेले होते. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ते परत आले तेव्हा ब्रुनोला त्याची आई बेडरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली आणि त्याचे वडील गंभीर जखमी झाले होते. दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी अर्पिना यांना मृत घोषित केले, तर गॅब्रिएल यांना पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.

चौकशीदरम्यान, ब्रुनोने पोलिसांना सांगितलं की, ज्येष्ठ नागरिक असणारे त्याचे पालक गंभीर आजारांनी ग्रस्त होते. अर्पिना यांना दमा आणि चालण्यास त्रास होत होता. त्या व्हीलचेअरवर होत्या. तर गॅब्रिएल देखील गंभीर आजाराशी झुंज देत होते. कुटुंबातील सदस्यांना संशय आहे की त्यांच्या प्रकृतीवरील दीर्घ आजार आणि नैराश्यामुळे गॅब्रिएल यांनी हे कृत्य केले असावे.

घटनेची माहिती मिळताच एसीपी नवनाथ यांच्यासह वरिष्ठ निरीक्षक जगदीश घाडीगावकर आणि इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. गॅब्रिएल यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती गंभीर आहे.

हेही वाचा :

महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळी मोठी भरती

विवाहित पुरुषांच्या प्रेमात का पडतात मुली? 5 महत्त्वाची कारणे

राजकीय नात्यांचा उत्सव कधी दिवाळी, कधी शिमगा