राज्यात एकीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा-ओबीसीमध्ये वादंग उभं राहिले असताना ‘हैद्राबाद गॅझेटीयर’वरून सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तर सध्या सुरु असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा- ओबीसीसह बंजारा समाजानेही बैठकीचं सत्र सुरु केल्याचे चित्र आहे. अशातच आता मातोश्रीवर देखील काँग्रेस नेत्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक होते आहे. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेस(politics)दावा सांगणार असून सतेज पाटील यांच्या नावाची विधान परिषद विरोधी पक्ष नेते पदासाठी वर्णी लागण्याची चर्चा आहे.

विधानस परिषद विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसचा दावा
मिळालेल्या माहितीनुसार, अंबादास दानवे यांचे विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ 29 ऑगस्टला पूर्ण झाला. त्यानंतर विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस (politics)आग्रही आहे. सध्या विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसचे आठ आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा आमदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत विधानस परिषद विरोधी पक्षनेते पदासाठी कॉंग्रेसने दावा केला असल्याची सूत्रांची माहिती आहे. या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस नेते चर्चा करत असल्याचीही माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

विधानस परिषद पक्षीय बलाबल
ठाकरे सेने – 6

काँग्रेस – 8

राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) – 2

उद्धव ठाकरे गटाचे आमदार
उद्धव ठाकरे

मिलिंद नार्वेकर

ज मो अभ्यंकर

अनिल परब

सुनील शिंदे

सचिन अहिर

काँग्रेस आमदार
सतेज पाटील

प्रज्ञा सातव

भाई जगताप

अभिजीत वंजारी

धीरज लिंगाडे

राजेश राठोड

जयंत आसगावकर ( पुणे शिक्षक मतदार संघ )

सुधाकर आडबाले ( नागपूर शिक्षक मतदार संघ )

दिल्लीतील हाय कमांड च्या चर्चे नंतर अंतिम निर्णय- विजय वडेट्टीवार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा लढायच्या, विधान परिषदेच्या विरोधी पक्षपदासंदर्भात देखील चर्चा झाली. नक्कीच सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र अंतिम निर्णय दिल्लीतील हायकमांडच्या चर्चेनंतर अधिक माहिती दिली जाईल, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.

मनसे आणि शिवसेना एकत्र येत असेल तर काँग्रेस सोबत राहणार का?
दरम्यान, उद्धव ठाकरे यांची काँग्रेस(politics) नेत्यांसोबत मनसेच्या युती संदर्भात सुद्धा चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मनसे आणि शिवसेना युती संदर्भात राज्यातील काँग्रेसकडून पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाची प्रतीक्षा असणार आहे.

मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येत असेल तर काँग्रेस पक्ष सोबत राहणार का? या बाबत अंतिम निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून घेण्यात येणार आहे. याबाबत पक्षश्रेष्ठीं सोबत राज्यातील काँग्रेसचे नेते चर्चा करणार आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य निवडणुका संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा :

महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळी मोठी भरती

विवाहित पुरुषांच्या प्रेमात का पडतात मुली? 5 महत्त्वाची कारणे

राजकीय नात्यांचा उत्सव कधी दिवाळी, कधी शिमगा