भारतातील अतिशय महत्त्वाच्या (Airport) विमानतळांपैकी एक असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ संदर्भातील महत्त्वाचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. चर्चा सुरू आहे ती म्हणजे हे विमानतळ बंद केलं जाण्याची. एकीकडे नवी मुंबई विमानतळाकडे वाढत असलेली उड्डाणांची संख्या पाहता या बातमीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. मात्र, हे विमानतळ दीर्घकाळासाठी नव्हे, तर काही तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी (Airport) विमानतळावर मेगाब्लॉक ठेवण्यात येणार आहे.मान्सूनपूर्व देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी ७ मे २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या सहा तासांसाठी विमानतळ पूर्णपणे बंद राहणार आहे. या कालावधीत दोन्ही धावपट्ट्या बंद राहतील आणि कोणत्याही विमानांचे उड्डाण किंवा लँडिंग होणार नाही. धावपट्ट्यांसह विमानतळावरील इतर पायाभूत सुविधांची देखभाल या वेळेत केली जाणार आहे. या देखभालीबाबत सर्व विमान कंपन्यांना सहा महिने आधीच सूचना देण्यात आल्या होत्या.
या मोहिमेला ‘मान्सून तयारी (Airport) मोहीम’ असं नाव देण्यात आलं आहे.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ही मोहीम राबवली जाते. या काळात काही तासांसाठी विमान वाहतूक पूर्णपणे थांबवली जाते. त्यामुळे ७ मे रोजी प्रवासाचे नियोजन असल्यास प्रवाशांनी आपापल्या उड्डाणांच्या वेळा आणि ठिकाण यांची माहिती पुन्हा एकदा तपासून घ्यावी.
शक्य असल्यास प्रवासाच्या (Airport) तारखांमध्ये बदल करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.या सहा तासांच्या कालावधीत धावपट्टीची सुरक्षितता वाढवण्यासाठी आवश्यक तांत्रिक दुरुस्ती केली जाणार आहे. विमानांचे उड्डाण आणि लँडिंग अधिक सुरक्षित व्हावे यासाठी झीज भरून काढण्यावर विशेष भर दिला जाणार असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ही कामं निर्धारित वेळेत पूर्ण केली जाणार आहेत.