भारतीय तेल कंपन्या अमेरिकेतून एलपीजी आयात दुप्पट करण्याच्या तयारीत आहेत ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यासाठी तेल कंपन्यांचे प्रयत्न सुरू आखाती देशांवरील अवलंबित्व कमी करण्यावर भर दिला जातोय भारत एलपीजी आयातीसाठी अल्जेरिया, अर्जेंटिना, नायजेरिया आणि मलेशिया यांसारख्या नव्या देशांचाही पर्याय शोधत आहेत

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका भारतासह संपूर्ण जगाला बसला. या युद्धामुळे इंधनचा पुरवठा विस्कलीत झाला आणि त्याचा सर्वाधिक त्रास भारताला सहन करावा लागला. आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या युद्धातून भारताने एक महत्त्वाचा धडा घेतला. ऊर्जा सुरक्षेसाठी आखाती देशांवरील आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत आता वेगाने प्रयत्न करत पाऊलं उचलत आहे. एका ताज्या रिपोर्टनुसार, भारताच्या सरकारी तेल कंपन्या अमेरिकेतून होणारी एलपीजीची आयात दुप्पट करण्याची तयारी करत आहेत. भारत सध्या अमेरिकेतून दरवर्षी २.२ दशलक्ष टन एलपीजी खरेदी करतो आणि हा आकडा आता दुप्पट केला जाण्याची शक्यता आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या एका वृत्तानुसार, या धोरणात्मक निर्णयामागील मुख्य उद्देश एलपीजीसाठी आखाती देशांवरील भारताचे अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी करणे हे आहे. त्याचसोबत भविष्यातील कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी एक सुरक्षित आधार तयार करणे हा आहे. (gas cylinder) यापूर्वीही भारताने आपल्या तेल आयातीच्या स्रोतांमध्ये विविधता आणली आहे आणि निर्णय घेतला जात आहे. आखाती देशांव्यतिरिक्त भारत रशिया, व्हेनेझुएला आणि आता इराणकडून कच्च्या तेलाची आयात करत आहे.
पूर्वी पश्चिम आशियातील युद्धादरम्यान आखाती देशांमधून येणारी एलपीजी जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकली होती. दरम्यान अमेरिका भारतासाठी सर्वात मोठी मदत म्हणून पुढे आली. केप्लरच्या आकडेवारीनुसार, भारतीय बाजारपेठेत अमेरिकन एलपीजीचा वाटा अनेक पटींनी वाढला आहे. एका तेल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, ‘युद्धाच्या काळात आम्हाला कच्च्या तेलाच्या उपलब्धतेबद्दल खात्री होती. पण एलपीजीबद्दल मोठी चिंता निर्माण झाली होती कारण आखाती देशांव्यतिरिक्त जगात फार कमी देश मोठ्या प्रमाणावर त्याचे उत्पादन करतात. (gas cylinder) अशा संकटात अमेरिकेकडून झालेल्या अखंड पुरवठ्यामुळे देशात कोणतीही कमतरता भासली नाही.
२०२५ मध्ये भारताने आपल्या एकूण एलपीजी गरजेच्या ८ टक्क्यापेक्षा कमी एलपीजी अमेरिकेकडून खरेदी केला. त्यानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील वार्षिक कराराच्या अंमलबजावणीनंतर जानेवारी २०२६ मध्ये हा वाटा १२ टक्क्यांपर्यंत वाढला गेला. अमेरिका आणि इराण यांच्यातील फेब्रुवारीतील युद्ध आणि आखाती देशांकडून होणारा पुरवठा खंडित झाल्यानंतर अमेरिकन एलपीजीचा वाटा ३७ टक्क्यांपर्यंत वाढला. सध्या हा वाटा विक्रमी ६५ टक्क्यांवर पोहोचला आहे. (gas cylinder) दरम्यान, भारताला एलपीजीसाठी अमेरिकेवर पूर्णपणे अवलंबून राहायचे नाही. आपल्या खरेदीत अधिक विविधता आणण्यासाठी भारतीय तेल कंपन्या आता आखाती देशांव्यतिरिक्त अल्जेरिया, अर्जेंटिना, नायजेरिया आणि मलेशियासारख्या देशांकडून एलपीजी खरेदी करण्याचे मार्ग शोधत आहेत.
हेही वाचा :
शेतकऱ्यांनो कर्जमाफी यादीत नाव कसं तपासाल?