पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च पुरस्कार,पूर्वेत भारताचा मोठा दबदबा..

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी तीन दिवसांच्या इंडोनेशियाच्या दौऱ्यावर पोहचले.(Prime Minister) 6 ते 8 जुलैच्या या दौऱ्यात दोन्ही देशातील जुन्या संबंधांना पुन्हा उजाळा मिळेलच. पण व्यापारी आणि इतर अनेक मुद्दांवर नवीन करार होतील. मे 2018 मध्ये भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीवर एकमत झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच भारतीय संस्कृतीशी नाळ जोडलेल्या चीनचा या पट्ट्यातील वाढता दबदबा आणि ब्राह्मोस क्षेपणास्त्राविषयी दोन्ही देशातील रणनीती हा कळीचा मुद्दा ठरू शकतो.मोदी इंडोनेशियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना इंडोनेशियाने आपला सर्वोच्च सन्मान देण्याचे जाहीर केले आहे. ‘बिंटांग आदिपूर्णा रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया’ हा किताब देऊन मोदींचा सन्मान करण्यात येणार आहे. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी ही घोषणा केली आहे. जगातील अनेक देशांनी मोदींचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान केला आहे. त्यात या पुरस्काराची भर पडली आहे.

परराष्ट्र मंत्रालयानुसार, इंडोनेशिया आसियान क्षेत्रात भारताचा(Prime Minister) दुसरा व्यापारातील सहकारी, सहभागीदार म्हणून समोर आलेला आहे. गेल्या दोन दशकात दोन्ही देशातील व्यापारात विलक्षण वाढ झाली आहे. वर्ष 2005-06 मध्ये व्दिपक्षीय करार 4.3 अब्ज अमेरिकन डॉलर इतका होता. 2022-23 या वर्षात ही वृद्धी 38.84 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहचली. तर वर्ष 2024-25 मध्ये दोन्ही देशात एकूण व्यापार 28.15 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहचला.वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2024-25 मध्ये भारताने इंडोनेशियात 5.38 अब्ज अमेरिकन डॉलरची निर्यात केली. तर इंडोनेशियाने या कालावधीत 22.78 अब्ज अमेरिकन डॉलरची आयात केली. दोन्ही देशात एकूण 28.15 अब्ज अमेरिकन डॉलर इतका व्यापार झाला.भारत इंडोनेशियातून कोळसा खरेदी करणारा दुसरा देश आहे.

ऑपरेशन सिंदूरमध्ये हवेतून हवेत लक्षााचा अचूक भेद करणारे क्षेपणास्त्राचा भारताने(Prime Minister) यशस्वी वापर केला. ही क्षेपणास्त्रे इंडोनेशिया आयात करणार आहे.स्टील, निकेल आणि दुर्मिळ घटक अशा महत्त्वांच्या खनिज साखळी पुरवठा दोन्ही देश मजबूत करण्यावर भर देतील.इंडोनेशिया ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा साठा वाढवत आहे. अधिक ब्रह्मोस बॅटरी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.तर कच्चे पाम तेल आयात करणाऱ्यांमध्ये सुद्धा भारताचा समावेश आहे. याशिवाय भारत इंडोनेशियाकडून खनिज, रबर, पल्प आणि पेपर, हायड्रोकार्बन आयात करते. तर रिफाईंड पेट्रोलियम उत्पादन, मोठी वाहनं, दूरसंचार उपकरणं, कृषी उत्पादनं, गोवंशीय मांस, औद्योगिक उत्पादन आणि प्लास्टिकची निर्यात भारत करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडोनेशिया दौऱ्यात मोठे निर्णय होऊ शकतात. त्यात इंडोनेशियासाठी खास EVM विकसीत करण्यासाठी भारत सहकार्य करणार आहे.

हेही वाचा :

LPG गॅस सिलिंडरचे संकट संपणार, भारतीय तेल कंपन्यांनी घेतला मोठा निर्णय?

शिवसेनेचे सात नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेससोबत?

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांनो सावधान? तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?