‘मी तिचं मत ऐकण्याइतका ’ लेक आराध्याबद्दल अभिषेक बच्चन हे काय बोलून गेला ?

अभिषेक बच्चन लवकरच ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘गुरु’, ‘युवा’, ‘धूम’ आणि ‘दिल्ली 6’सारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडणाऱ्या अभिषेकला अनेकदा अंडररेटेड अभिनेता म्हणून संबोधलं जातं, तर त्याची तुलना कायमच अमिताभ बच्चन यांच्याशी केली जाते.

दरम्यान, एका मुलाखतीत अभिषेकने वैयक्तिक आयुष्यातील एक वेगळी बाजू उघड केली आहे. आपल्या कामाबद्दल तो कुटुंबातील एका सदस्याचं मत मुद्दाम घेत नाही, आणि ती व्यक्ती म्हणजे त्याची मुलगी आराध्या बच्चन. चित्रपटांबाबत तिचं मत का विचारत नाही, याबाबत बोलताना अभिषेक म्हणाला की, “मी तिला कधीच विचारणार नाही. कारण एकदा तिने सांगितलं की तिला माझं काम आवडलं किंवा नाही आवडलं, तर त्याचा परिणाम माझ्या कामाच्या पद्धतीवर होऊ शकतो.”

तो पुढे म्हणाला की, आजची मुलं खूप स्पष्टवक्ती आणि आत्मविश्वासू आहेत. त्यांना काय हवं आहे हे ठाऊक असतं आणि ते आपलं मत थेट मांडतात. मात्र कधी कधी त्या प्रामाणिक प्रतिक्रियांचा स्वीकार करणं सोपं नसतं. एक पालक म्हणून इतरांच्या मतांपेक्षा स्वतःच्या विश्वासावर काम करणं अधिक योग्य वाटतं, ( Abhishek Bachchan )असंही त्याने स्पष्ट केलं.अभिषेकने पुढे सांगितलं की भविष्यात कदाचित तो आपल्या मुलीकडून मत घेईल, पण सध्या तरी तिच्या विचारांनी प्रभावित व्हायचं नाही, अशी त्याची भूमिका आहे. “ती कधीतरी तिचं मत नक्की देईल, पण मी अजून तिला विचारलेलं नाही,” असं तो हसत म्हणाला.

हेही वाचा

आता मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश; मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय

हादरवणारी घटना; आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

कॅन्सरची सुरूवातीची लक्षणे कोणती?