विद्यार्थ्यांनो लक्ष द्या 2027 पासून NEET परीक्षेत मोठे बदल?

वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नीट यूजी 2027 परीक्षेच्या स्वरूपात व्यापक बदल करण्याचा विचार सुरू असल्याची चर्चा आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्था नव्या परीक्षा प्रणालीवर काम करत असल्याचे विविध माध्यमांच्या अहवालांतून समोर आले आहे. मात्र, या बदलांबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसल्याने विद्यार्थ्यांनी सध्या त्याकडे संभाव्य प्रस्ताव म्हणूनच पाहावे.

सहा दिवस परीक्षा घेण्याचा प्रस्ताव सध्या नीट-यूजी परीक्षा देशभरात एकाच दिवशी आणि एका सत्रात पेन व शीटच्या माध्यमातून घेतली जाते. दरवर्षी सुमारे 22 ते 23 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतात. मात्र, समोर आलेल्या प्रस्तावानुसार 2027 पासून परीक्षा पद्धतीत बदल करून ती सलग पाच ते सहा दिवस विविध शिफ्टमध्ये आयोजित करण्याचा विचार सुरू आहे.या नव्या आराखड्यानुसार प्रत्येक दिवशी जवळपास पाच लाख विद्यार्थी परीक्षा देतील. त्यामुळे एकाच दिवशी परीक्षा केंद्रांवर होणारी मोठी गर्दी टाळता येईल. (NEET exam) तसेच परीक्षा व्यवस्थापन अधिक सुलभ आणि प्रभावी करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, या प्रस्तावाला अद्याप किंवा शिक्षण मंत्रालय यांची अधिकृत मंजुरी मिळालेली नाही.प्रस्तावित बदलांमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आधारित परीक्षेऐवजी पूर्णपणे प्रणाली लागू करण्याचा विचार आहे. सध्याच्या पेन-पेपर पद्धतीत प्रश्नपत्रिका छपाई आणि वाहतुकीदरम्यान पेपरफुटीचा धोका असल्याचे अनेक घटनांमधून दिसून आले आहे. CBT पद्धतीमध्ये प्रश्नपत्रिका डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवली जाईल आणि परीक्षा सुरू होण्याच्या काही मिनिटांपूर्वीच ती विद्यार्थ्यांच्या संगणकावर उपलब्ध होईल. (NEET exam) त्यामुळे पेपरफुटीच्या शक्यता मोठ्या प्रमाणात कमी करण्याचा उद्देश आहे.

याशिवाय, परीक्षा केंद्रांच्या व्यवस्थेतही बदल होऊ शकतात. सध्या हजारो खासगी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये परीक्षा घेतली जाते. भविष्यात परीक्षा केंद्रांची संख्या सुमारे 5,000 वरून 1,000 पर्यंत कमी करून ती प्रामुख्याने केंद्रीय विद्यालय आणि जवाहर नवोदय विद्यालय यांसारख्या सरकारी संस्थांमध्ये ठेवण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. (NEET exam) वेगवेगळ्या दिवसांमध्ये परीक्षा झाल्यास प्रश्नपत्रिकेच्या कठीणतेतील फरक लक्षात घेऊन प्रमाणे वापरण्याचाही प्रस्ताव आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे परसेंटाइल संबंधित शिफ्टमधील कामगिरीच्या तुलनेत निश्चित केले जाते.विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे अभ्यासक्रमात कोणताही बदल प्रस्तावित नाही. आणि हे विषय पूर्वीप्रमाणेच राहणार आहेत. मात्र, संगणकावर परीक्षा देण्याचा सराव आवश्यक ठरू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार हे प्रस्ताव यांच्या समितीच्या शिफारशींवर आधारित असून ऑक्टोबर 2026 पर्यंत ची परीक्षा प्रणाली अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याचे उद्दिष्ट आहे. अधिकृत अधिसूचना येईपर्यंत विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सध्याच्या अभ्यासक्रमानुसार तयारी सुरू ठेवावी.

हेही वाचा :

कमी वयात केस पांढरे होतायेत? 5 कारणे ठरू शकतात जबाबदार?

क्रिकेट विश्वात खळबळ इंग्लंड पराभवानंतर गंभीरसमोर ‘संजू’च्या घोषणा?

पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान?