पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद ; कोणत्या भागांत येणार नाही पाणी?

पुणे महानगरपालिका कडून पुणेकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. आगामी गुरुवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून, विविध जलकेंद्रांमध्ये होणाऱ्या तांत्रिक देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. (water) उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही कामे हाती घेतली जात असल्याने नागरिकांना पाण्याचा योग्य आणि नियोजित वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या अंतर्गत खडकवासला धरण ते पर्वती जलकेंद्र दरम्यानच्या मुख्य जलवाहिनीवर ३००० मिलीमीटर व्यासाचे नवीन फ्लो मीटर बसवण्यात येणार आहे.(Water) तसेच वडगाव जलशुद्धीकरण केंद्र येथे टाकीच्या भिंतीचे कोअर कटिंग आणि आवश्यक व्हॉल्व्ह दुरुस्तीची कामे एकाच वेळी पूर्ण केली जाणार आहेत. या कामांमुळे पर्वती, वडगाव, लष्कर, वारजे, चिखली, चतुःश्रुंगी आणि होळकर या प्रमुख जलकेंद्रांमधून होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. गुरुवारी सकाळी ६ वाजल्यापासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ही कपात लागू असेल, तर शुक्रवारी सकाळी पाणी उशिरा आणि कमी दाबाने येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या निर्णयाचा परिणाम वारजे, चांदणी चौक, गांधी भवन, पॅनकार्ड क्लब परिसर, शिवणे औद्योगिक वसाहत, एसएनडीटी टाकी परिसर तसेच महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांवर होणार आहे. पर्वती परिसरातील अनेक भागांनाही याचा थेट फटका बसणार असून दैनंदिन पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. (Water) उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता नागरिकांनी बुधवारीच आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तांत्रिक यंत्रणा सक्षम करण्यासाठी ही कामे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट करत, पाणीपुरवठा विभागाने पुणेकरांना सहकार्य करण्याचे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा

आता मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश; मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय

हादरवणारी घटना; आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

कॅन्सरची सुरूवातीची लक्षणे कोणती?