गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील गणेशमूर्ती कारखान्यांमध्ये लगबग वाढली आहे. मोजके मूर्तीकार आणि शेकडो कारागीर दिवसाचे आठ-दहा तास मूर्ती घडविणे व रंगविण्याच्या कामात गुंतले आहेत. बहुतांश मूर्ती तयार असून रंगकाम अंतिम टप्प्यात आले आहे. (Ganeshotsav) काही मूर्ती परदेशात तसेच काश्मीर सीमेवरील भागातही रवाना झाल्या असल्याची माहिती मूर्तीकार विजय गवळी यांनी दिली.

मूर्तींचे काम गतवर्षीच्या गणेशोत्सवानंतरच सुरू झाले होते. मे महिन्यातच मूर्ती तयार करून वाळविण्यात आल्याने सध्याच्या पावसाचा त्यांच्यावर परिणाम झालेला नाही. (Ganeshotsav) अधिक महिन्यामुळे यंदा मूर्तीकामासाठी महिनाभराचा अतिरिक्त अवधी मिळाल्याने कारागिरांना काम वेळेत पूर्ण करता आले.
सांगलीत यंदा सुमारे एक लाख गणेशमूर्तींची निर्मिती होत आहे. (Ganeshotsav)शाडूच्या मूर्ती घडविणारे अवघे दोन-तीन मूर्तीकार असून ३० ते ४० कारागीर या व्यवसायात कार्यरत आहेत. शहरात किमान एक हजार विक्रेते तयार मूर्तींचे स्टॉल उभारतात. शाडूच्या मूर्ती २०० ते १५ हजार, तर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ५०० ते २५ हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. गवळी म्हणाले, ‘घरोघरी बसविण्यात येणाऱ्या छोट्या मूर्ती शाडूच्या असल्या, तरी गणेशोत्सव मंडळांकडून मोठ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींनाच अधिक मागणी असते. यंदा बंदी उठल्याने त्यांच्या निर्मितीत वाढ होण्याची शक्यता आहे.’ कारागीर तुषार आपटे यांनी सांगितले की, पेणहून शाडूच्या मूर्ती सांगलीत दाखल झाल्या असून त्या आकर्षक व विविध रूपांत उपलब्ध आहेत. महागाईमुळे यंदा मूर्तींच्या किमतीत १५ ते २० टक्के वाढ अपेक्षित आहे.
हेही वाचा :
कमी वयात केस पांढरे होतायेत? 5 कारणे ठरू शकतात जबाबदार?
क्रिकेट विश्वात खळबळ इंग्लंड पराभवानंतर गंभीरसमोर ‘संजू’च्या घोषणा?
पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान?