नर्सेस व कर्मचारी मारहाणीच्या निषेधार्थ सीपीआरमध्ये आंदोलन?

कल्याण – डोंबिवली येथील रुग्णालयात नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ला, मारहाण व अवमानकारक वर्तनाच्या निषेधार्थ महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सेस फेडरेशनने शुक्रवारी सकाळी सीपीआर परिसरात निदर्शने केली. (Federation) हल्ला करणाऱ्या नगरसेवक व संबंधित पदाधिकाऱ्यांना तातडीने पदावरून हटवा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आरोग्य कर्मचाऱ्यांवरील वाढत्या हल्ल्यांच्या निषधार्थ सीपीआर येथील नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून दिवसभर काम केले. ‘हल्लेखोरांचा धिक्कार असो, हल्ला करणाऱ्यांना पदावरून निलंबित करा, सरकार होश मे आव होश आव’ अशा घोषणांनी सीपीआर परिसर दणाणून सोडला. अशा प्रकारच्या घडणाऱ्या घटनांमुळे आरोग्य कर्मचाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Federation)त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. नर्सेस फेडरेशनच्या जिल्हाध्यक्ष हशमत हवेरी, पूजा शिंदे, सुजाता उरुणकर, प्रवीण शिंदे, ज्ञानेश्वर मुठे, मनुजा रेणके, माणसी मुळे यांच्यासह पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा :

बच्चू कडू आक्रमक मंत्र्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव केला सादर?

अशैक्षणिक धोरणाविरोधात हजारो शिक्षक रस्त्यावर?

‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये जगाला दिसली भारताची ताकद : मोदी?