देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांचा खरा जाणता राजा, सुरेश धस यांनी उधळली स्तुतीसुमने?

सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांचा खरा जाणता राजा असल्याचं कौतुक धस यांनी केलं.

राज्यात पावसाचा खंड पडल्याने अखेर सरकारला राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा लागला. राज्यातील 265 तालुक्यात कोरडा दुष्काळ मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले. विरोधकांनंतर आता सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यास सुरुवात केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून परिस्थती जाणून घेतले. (farmers) तर काही शेतकऱ्यांचे अश्रू पुसत आधार देणयाचे कार्य केलं. कोरडा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्रिय झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरून कौतुक केलं. त्यांना थेट जाणता राजा म्हणत धस यांच्याकडून करण्यात आलं आहे.

बीड जिल्ह्याच्या आष्टीमध्ये फळबाग शेतकऱ्यांचा संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यात सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळ आणि मदतीचं देखील कौतुक केलं. (farmers) यावेळी विरोधकांच्या दौऱ्यावर कौतुक केलं. बीडमधील एका नेत्याने मुख्यमंत्री फडणवीस यांना शहरी भागाचा मुख्यमंत्री म्हटले होते. तर त्यांना गाय धुता येईल का? अशी टीका त्यांनी केला होती. या टीकेचा समाचार सुरेश धस यांनी घेतला. त्यांनी म्हटलं की, ‘ जिल्ह्यातील चाळीस-पन्नास वर्षांची दादागिरी मोडून काढण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं. त्याचवेळी संकटग्रस्त फळफागांना हेक्टरी 6 लाख 55 हजार रुपयांची मदत देण्याची मागणी व्यासपीठावरून केली.

‘विरोधक कशाला हिंडताहेत. त्यांना नेमकी गरज काय? मुख्यमंत्र्यांनी तीन जिह्याचा 4 दिवसांत दौरा केला. सोलापूर, लातूर, धाराशिव जिल्ह्यात फडणवीसांनी दौरा केला. मुख्यमंत्र्यांनी लातूरमध्ये म्हटलं की, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळेल. (farmers) त्यानंतर त्यांची तिकडे जाऊन ठाकरेंची जत्रा… मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, दसरा आणि दिवाळीत खात्यावर पैसे येणार आहे. त्यात कर्जमाफी देखील झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा खरा जाणता कोणी असेल, तर देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, असं मी जबाबदारी बोलत आहे’.

हेही वाचा : 

बँका रविवारी सुरू, सोमवारी बंद कारण काय? पुढच्या आठवड्यात कोणत्या दिवशी व्यवहार करता येणार?

MPSC पेपरफुटी प्रकरणात रोहित पवारांचा खळबळजनक दावा, थेट स्क्रीनशॉट शेअर करून नवा आरोप काय?

 केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर ऑक्टोबरमध्ये मिळणार मोठी पगारवाढ?