शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कोणत्या महिन्यात बरसणार पाऊस? भेंडवळने वर्तवला अंदाज

साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेल्या भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकित जाहीर झाले असून, त्यात यंदाच्या पावसाळ्याचा आणि देशातील स्थितीचा महत्त्वपूर्ण अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर करण्यात आलेल्या या परंपरागत घटमांडणीत यंदाचा शेतीसाठी(farmers) पावसाळा सर्वसाधारण ते चांगला राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

भेंडवळ घटमांडणीची विश्वासार्हता आणि अचूकता गेल्या अनेक वर्षांत सिद्ध झाल्याने बळीराजासह सर्वसामान्य नागरिकही या अंदाजाकडे लक्ष ठेवून असतो. यावर्षीही घटमांडणीच्या माध्यमातून शेती(farmers), हवामान, चारा, नैसर्गिक आपत्ती आणि राजकीय घडामोडींचा अभ्यासपूर्वक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पहिला महिना: कमी-अधिक पाऊस, काही ठिकाणी अनिश्चिततेची शक्यता
दुसरा महिना: चांगला व सर्वसाधारण पाऊस
तिसरा महिना: सरासरी पावसाचा प्रवाह
चौथा महिना: अवकाळी पावसाची शक्यता

देशावर संकट आणि आपत्तीची शक्यता :
या घटमांडणीत सर्वात चिंतेची बाब म्हणजे देशावर संभाव्य मोठ्या संकटाचा इशारा देण्यात आला आहे. युद्धजन्य परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असून, नैसर्गिक आपत्ती – विशेषतः भूकंप यांची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

यावर्षी पान विडा, पुरी आणि करंजी हे पारंपरिक चिन्ह गायब होते, ज्यामुळे राजकीय भाकित करणे अशक्य झाले. मागील ५० वर्षांमध्ये ही घटना पहिल्यांदाच घडल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा :

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन 1 मे रोजीच का साजरे करतात?

लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून मुलानेच बापाला संपवलं; आईला मारहाण केल्याचा राग अनावर

रात्री झोपण्याआधी आहारात करा ‘या’ गुणकारी पदार्थाचे सेवन, आतड्यांमधील घाण होईल क्षणार्धात स्वच्छ