क्रेटा आणि डस्टरचं मार्केट धोक्यात, निसानने लाँच केली ‘बेबी पेट्रोल’ एसयूव्ही?

भारतीय वाहन बाजारात आपला जम अधिक घट्ट करण्यासाठी निसान कंपनीने अखेर आपली बहुप्रतिक्षित(Nissan) आणि डॅशिंग एसयूव्ही अधिकृतपणे भारतात लाँच केली आहे. या नवीन कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 10.49 लाख रुपये ठेवण्यात आली असून टॉप व्हेरियंटची किंमत 18.59 लाख रुपयांपर्यंत जाते.

निसानने 6 व्हेरियंट्स आणि 4 उत्कृष्ट इंटेरियर थीम्ससह ही कार बाजारात (Nissan)आणली असून तिचे बुकिंग आजपासून सुरू झाले आहे. या कारची डिलिव्हरी 20 जुलैपासून ग्राहकांना मिळण्यास सुरुवात होईल. मॅग्नाईट एसयूव्ही आणि ग्रॅव्हाईट एमपीव्हीनंर ही कार निसानच्या ताफ्यात सामील झाली आहे.

या कारच्या लाँचिंग वेळी बोलताना निसानचे मुख्य कार्यप्रदर्शन अधिकारी(Nissan) गिलाउम कार्टियर यांनी सांगितले की, “निसानच्या जागतिक योजनांमध्ये भारत आता अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार असून हे देश अधिकृतपणे आमचा प्रमुख निर्यात पाया बनत आहे.” ही कार भारतातच तयार केली जाईल आणि इथूनच ती दक्षिण आफ्रिका व मध्य पूर्वेकडील देशांमध्ये निर्यात केली जाईल.

एक्स्टेरिअर
या कारचे डिझाईन निसानच्या जागतिक(Nissan) स्तरावर प्रसिद्ध असलेल्या मोठ्या ‘पेट्रोल’ एसयूव्हीपासून प्रेरित आहे. या कारला कारला एक सरळ आणि आक्रमक स्टान्स देण्यात आला असून यात 18-इंचचे अलॉय व्हील्स, कनेक्टिंग लॅम्पसह C-सिग्नेचर, पूर्ण रुंदीचा होरिझॉन्टल लाईटबार, पुढच्या बाजूला C-आकाराचे प्रोटेक्टर्स आणि बोनेटवर ‘Nissan’ चे बॅजिंग मिळते. गाडीला हाय-ग्लॉस प्रीमियम फिनिश ग्रिल आणि हिमालयापासून प्रेरित ‘साईड डेकल’ देण्यात आले आहे, ज्यामुळे तिला मजबूत लुक मिळतो.

आकार आणि कलर्स
या कारची लांबी 4,348 मिमी, रुंदी 1,815 मिमी, उंची 1,674 मिमी आणि व्हीलबेस 2,657 मिमी आहे. (Nissan)तसेच, यात 212 मिमीचा उत्कृष्ट ग्राउंड क्लीअरन्स मिळतो. ही कार पर्ल व्हाइट, ब्लेड सिल्व्हर, ओनिक्स ब्लॅक, मूनबो ग्रे, फ्लेअर गार्नेट रेड आणि इंडिगो ब्लू या 6 आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 5 मोनोटोन आणि 6 ड्युअल-टोन असे एकूण 11 पर्याय ग्राहकांना मिळतील.
इंटेरियर आणि फीचर्स

निसान टेक्टॉनच्या केबिनमध्ये प्रवाशांच्या सुविधेसाठी आधुनिक फीचर्सचा (Nissan)भरणा करण्यात आला आहे. यात पावर्ड फ्रंट सीट्स आणि व्हेंटिलेटेड सीट्स, गुगल मॅप्ससह इन-बिल्ट गुगल सिस्टीम, ड्युअल-झोन एसी कंट्रोल आणि पॅनोरॅमिक सनरुफ देण्यात आले आहे.

इंजिन आणि मायलेज
निसान टेक्टॉनमध्ये ग्राहकांना दोन टर्बो-पेट्रोल इंजिनचे(Nissan) पर्याय देण्यात आले आहेत. 1.0-लिटर इंजिन हे रोजच्या प्रवासासाठी उत्तम पर्याय असून हे इंजिन 100 एचपीची पॉवर आणि 166 एनएमचा टॉर्क जनरेट करते. याचे मायलेज 19.4 किमी प्रतिलिटर इतके जबरदस्त आहे.

याशिवाय यात 1.3- लिटर इंजिन मिळते. अधिक पॉवर हवी असणाऱ्यांसाठी हे इंजिन तब्बल 163 एचपीची पॉवर (Nissan)आणि 280 एनएमचा टॉर्क देते. याचे मायलेज 18.5 किमी प्रतिलिटर असून यामध्ये6 -स्पीड मॅन्युअलसह 7-स्पीड ड्युअल-क्लच ट्रान्समिशन ऑटोमॅटिक गियरबॉक्सचा पर्याय मिळतो.

5 वर्षांचा ‘निसान केअर पॅक’
ग्राहकांना ही कार अधिक खास बनवण्यासाठी (Nissan)50+ पेक्षा जास्त वैयक्तिकृत पर्याय मिळतील. तसेच कंपनी यासोबत 5 वर्षांचा ‘निसान केअर पॅक’ देखील देत आहे.

हेही वाचा :

कमी वयात केस पांढरे होतायेत? 5 कारणे ठरू शकतात जबाबदार?

क्रिकेट विश्वात खळबळ इंग्लंड पराभवानंतर गंभीरसमोर ‘संजू’च्या घोषणा?

पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान?Edit