उन्हाळ्यात काहीतरी चविष्ट, झणझणीत आणि (tomato)थोडं टॅंगी खायची इच्छा होते ना? मग ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे! टोमॅटो आणि कैरी या दोन आंबटगोड घटकांनी तयार झालेली ही खास चटणी तुमच्या रोजच्या जेवणात एक भन्नाट चव आणते. गरम भाकरीसोबत, वरण-भातासोबत किंवा अगदी पराठ्यासोबतही ही चटणी चवदार लागते. चला तर मग, आजच बनवा ही उन्हाळी स्पेशल टोमॅटो-कैरीची चवदार चटणी.

साहित्य
२ टेबलस्पून तेल
२ टोमॅटो
अर्धी कच्ची कैरी
८-१० लसूण पाकळ्या
३ हिरव्या मिरच्या
१ टीस्पून साखर
चवीनुसार मीठ
१ टीस्पून काश्मिरी लाल तिखट
बारीक चिरलेला अर्धा कांदा
कोथिंबीर
अर्धा लिंबाचा रस (tomato)ऐच्छिक
कृती
२ टोमॅटो अर्धे कापून घ्या.
कढईमध्ये कच्ची कैरी, लसूण आणि हिरव्या मिरच्यांसोबत टोमॅटो भाजून घ्या.
टोमॅटो थोडे थंड झाल्यावर त्याची सालं काढा.सर्व भाजलेले घटक साखर आणि मीठ घालून पाटा वरवंट्यावर चांगलं वाटून घ्या. पाटा वरवंटा नसेल तर मिक्सरमध्ये तुम्ही हे (tomato) बारीक करू शकता.वाटलेल्या मिश्रणात काश्मिरी तिखट, चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून नीट मिक्स करा.तुमची खास टोमॅटो-कैरी चटणी आता तयार आहे.
हेही वाचा :
शिवसेना ठाकरे गटाला हा मोठा धक्का…
महिलेकडे 10 लाखांची खंडणी मागणाऱ्याला ठोकल्या बेड्या; कोल्हापुरातून घेतले ताब्यात
‘मला जितका इस्लाम समजलाय…,’ धर्मांतर करणाऱ्या दीपिकानं पहलगाम हल्ल्याबाबत हे काय म्हटलं?