कोल्हापूर: प्रेमाच्या त्रिकोणातून खून, अल्पवयीन संशयिताच्या दारात ४० -५० बायका गेल्या अन्

केर्ले ता. करवीर येथील तिहेरी प्रेम प्रकरणातून खून झालेल्या(door)महेंद्र प्रशांत कुंभार याच्या कुटुंबासह गावातील ४०-५० महिलांच्या जमावाने अल्पवयीन संशयिताच्या मुलाच्या दारात जाऊन शिवीगाळ केली. मंगळवारी दुपारी त्याच्या घरच्यांनी बेकरी उघडल्याच्या कारणावरून महिलांचा जमाव घराकडे गेला होता. गावातील एका प्रतिष्ठित व्यक्तीने महिलांची समजूत काढून महिलांना शांत केले.

याबाबत मिळालेली माहिती अशी, तिहेरी प्रेम प्रकरणातून तीन (door)जूनच्या रात्री महेंद्र कुंभार याचा अल्पवयीन मित्राने दगडाच्या खणीत ढकलून खून केला होता. संशयित सध्या बालसुधारगृहात आहे. या घटनेला पावणेदोन महिने झाले आहेत.

मंगळवारी दुपारी संशयिताच्या घरच्यांनी कोल्हापूर-पन्हाळा रस्त्याला लागून असलेली बेकरी उघडली होती. हे कुंभार कुटुंबियांना समजल्यावर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास महेंद्रच्या आईसह गावातील ४०-५० महिलांनी बेकरी चालू करायची नाही, असा दारात जाऊन दम दिला.(door) आमच्या मुलाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत बेकरी चालू करायची नाही, असे सांगत शिवीगाळ केली.

हेही वाचा :

7 कोटी विद्यार्थ्यांना गुडन्यूज! शाळेतच होणार आधार कार्ड संदर्भात ‘ही’ महत्त्वाची कामं

महायुतीच्या महामंडळ जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, भाजपला सर्वाधिक जागा?

पेट्रोलचं नो टेन्शन! 60 हजारांहून कमी किमतीत मिळतात या 5 ई-स्कूटर, एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स