देशभरात गाजत असलेल्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणानंतर विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. पेपरफुटीच्या सर्व प्रकरणांचा जलद निपटारा व्हावा यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट (paper leak) स्थापन करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय राजधानी दिल्ली येथील जंतर-मंतर परिसरात ‘कॉकरोच जनता पार्टी’ या बॅनरखाली सुरू असलेल्या नीट (NEET) पेपरफुटीविरोधातील आंदोलनाची दखल केंद्र सरकारने घेतली आहे.विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोषींना कठोर आणि तातडीने शिक्षा होण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट उभारण्याचे निर्देश दिले. (paper leak) संबंधित विभागांनी आवश्यक ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
यासंदर्भात एक्स (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील आपल्या पोस्टमध्ये मोदी यांनी देशातील तरुणांचे कल्याण आणि उज्ज्वल भविष्य हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे नमूद केले. (paper leak) तसेच पेपरफुटीच्या सर्व प्रकरणांची सुनावणी जलदगतीने पूर्ण व्हावी, आरोपींना शक्य तितक्या लवकर शिक्षा मिळावी आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण व्हावे, यासाठी सरकार सातत्याने पावले उचलत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तरुणांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्याला कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
हेही वाचा :
हेरवाडमध्ये पाण्याच्या टाकीतून हजारो लिटर पाणी गळतीने वाया?