मोबाईलची क्रेझ दिवसेंदिवस लोकांमध्ये वाढतच आहे. याची क्रेझ फक्त मोठ्यांमध्येच नाही तर आता लहान लहान मुलांमध्येही दिसून येते. लहान मुलांनाही मोबाईल फोनचे इतके व्यसन लागले आहे की ते जास्त काळ त्यापासून दूर राहू शकत नाहीत. यासंबंधीचे अनेक व्हिडिओ याआधीही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात एक धक्कादायक प्रकार दिसून आला. यात मोबाईल हिसकावून घेतला म्हणून संतप्त झालेल्या एका विद्यार्थिनीने(Student) शिक्षिकेला अक्षरशः चपलेने मारहाण केली.

ही संपूर्ण घटना सोमवारी आंध्र प्रदेशातील विजयनगरम येथील रघु अभियांत्रिकी महाविद्यालयात घडल्याचा आरोप आहे. विजयनगरम कॉलेजमध्ये, एका शिक्षिकेने विद्यार्थिनीचा(Student) फोन हिसकावला म्हणून विद्यार्थिनीने थेट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ती इथेच थांबली नाही तर पुढे आपल्या चपलेने तिने शिक्षिकेला मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर शिक्षिका आणि विद्यार्थिनी दोघींमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरु झाला.
यानंतर विद्यार्थिनीने(Student) शिक्षिकेला धमकी दिली की, “तू मला माझा फोन परत देशील की मी तुला चप्पलने मारू?” जेव्हा शिक्षिकेने फोन परत करण्यास नकार दिला तेव्हा संतप्त विद्यार्थिनीने तिच्यावर चप्पलने हल्ला केला. विद्यार्थ्याच्या कृत्यामुळे दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यांच्यातील हा वाद थांबण्यासाठी एका महिलेने आणि एका पुरूषाने हस्तक्षेप केला आणि व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे, विद्यार्थी आणि शिक्षकाला वेगळे करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनी तिचा फोन १२,००० रुपयांचा असल्याचा दावा करत आहे.
Kalesh broke out b/w a teacher and a student at Raghu College (Student got into an argument with the teacher after a teacher at Raghu Engineering College took a student's phone.) AP
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 22, 2025
pic.twitter.com/l76v9V5Jqq
हा व्हायरल व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओला आतापर्यंत 78 हजाराहून अनेक लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
एका युजरने लिहिले आहे, “अशाप्रकारे आपल्याला कळते की आपली जनरेशन इतकी वेडी आहे की ती कुणाचाही आदर करत नाही… फोनच्या व्यसनाने त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. शिक्षकावर चप्पल फेकणे हे लज्जास्पद आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भाऊ, आमच्या काळात शिक्षक आम्हाला कुत्र्यांसारखे मारायचे… तरीही आम्ही प्रतिसाद दिला नाही आणि हे आजचे विद्यार्थी”.
हेही वाचा :
डी.जी.पी. ते न्यूरो सर्जन उच्च वर्तुळातील शोकांतिका!
केएल राहुलकडून अपमानाची अचूक परतफेड; संजीव गोयंका यांचा हिशोब बरोबर! पाहा व्हीडिओ