केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार मोदींच्या कॅबिनेटमध्ये कोणाला संधी मिळणार बड्या नेत्याने सगळं सांगितलं

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे. मोदींच्या कॅबिनेटमध्ये कोणाला संधी मिळणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे .

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे. मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याचे संकेत दिले आहेत. संसदेतील हिवाळी अधिवेशनाच्या आधी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता व्यक्त केली आहे. तर शरद पवार यांनी एनडीएमध्ये सहभागी होण्यास नकार दिल्याचेही आठवलेंनी सांगितले. सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चेदरम्यान आठवलेंनी भाष्य केलं आहे. (Cabinet) यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं की, ‘कॅबिनेटचा विस्तार होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आधी फेरबदलाची शक्यता आहे. परंतु आता आंदोलने सुरू असल्यामुळे फेरबदल हे कधी होणार, याविषयी कोणतीही माहिती नाही. परंतु मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. (Cabinet) यात सर्व जातींच्या प्रमुख नेत्यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे.

आठवलेंनी पुढे सांगितलं की, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शरद पवार यांच्याशी बोलणं झालं. शरद पवार यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना आधी पुण्यात दाखल केले. डिस्चार्ज मिळाल्यानंतर तपासणीसाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल केले. आठवलेंनी सांगितलं की, पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांचे संबंध चांगले आहेत. राजकारण वेगळं आहे. वैयक्तिक पातळीवर दोन्ही नेते एकमेकांचा आदर करतात. ही बाब दोन्ही पक्षातील नेते देखील मान्य करतात. शरद पवारांचं मार्गदर्शन आम्हाला लाभत असतं. शरद पवारांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. यामुळे मोदींनी शरद पवारांना फोन करून विचारपूस केली. यात कोणतंही राजकारण नाही’. ‘शरद पवार हे एनडीएमध्ये सहभागी होण्यास तयार नाही. शरद पवार साहेब एनडीएमध्ये आल्यास त्यांचे स्वागत केले जाईल. परंतु एनडीएमध्ये न जाण्याची शरद पवारांची भूमिका आहे. राज्यात महायुतीतही प्रवेश करण्याची त्यांची इच्छा नाही’.

शरद पवार यांचे जवळचे मित्र मानले जाणारे विठ्टल सेठ मनियार यांनी ही गुरुवारी महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, पीएम मोदी यांनी शरद पवार यांच्याशी बोलताना सुप्रिया सुळे यांच्या नावाचा उल्लेख केल्याचा दावा आहे.(Cabinet) मनियार यांनी सांगितलं की, पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली. दोघांनी एकमेकांशी आदरातिथ्याने संवाद साधला’, त्यानंतर त्यांनी सांगितले की, शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा दिसत आहे. सुप्रिया आणि आम्ही मिळून सांभाळू. तुम्ही आराम करावा, असे मोदींनी त्यांना सांगितले.

हेही वाचा : 

शेतकऱ्यांना गोड बातमी अखेर आज आणि उद्या 5000 रुपये खात्यात येणार, सरकारची दिवाळी गिफ्ट

दिवाळीच्या एक दिवस आधीच राज ठाकरे यांचा सर्वात मोठा निर्णय, ट्विट करत म्हणाले

निवडणूक हरताच ट्रम्प लाइनवर आले, भारताला दिलासा देणारी मोठी घोषणा