हा फक्त झटका होता.., हार्दिकचा पराभवानंतर खेळाडूंना थेट मेसेज

मुंबई इंडियन्स आयपीएलच्या 18 व्या मोसमातील आपल्या साखळी (players)फेरीतील शेवटच्या सामन्यात विजय मिळवण्यात अपयशी ठरली. मुंबईने फक्त सामनाच गमावला नाही तर अंतिम फेरीत 2 वेळा पोहचण्याची संधीही गमावली. पंजाब किंग्सने जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात मुंबईवर एकतर्फी विजय मिळवला आणि क्वालिफायर 1 चं तिकीट मिळवलं. मुंबईने विजयासाठी दिलेलं 185 धावांचं आव्हान पंजाबने 9 बॉल राखून 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मुंबईच्या या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पंड्या नाराज झालेला दिसला. हार्दिकने पराभवानंतर प्रतिक्रिया दिली. तेव्हा हार्दिकच्या तोंडी सूर्यकुमारचेच बोल होते. हार्दिक तेच म्हणाला जे सूर्यकुमार यादव पहिल्या डावानंतर म्हणाला. सूर्या काय म्हणाला होता? तसेच हार्दिकने काय म्हटलं? हे जाणून घेऊयात.

मुंबई इंडियन्ससाठी सूर्यकुमार यादव याने सर्वाधिक 57 रन्स केल्या. तर इतरांनीही योगदान दिलं. त्यामुळे मुंबईने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 184 रन्स केल्या. मात्र मुंबई 200 पार पोहचण्यात अपयशी ठरली. पहिल्या डावानंतर सूर्याने दिलेल्या मुलाखतीत आम्ही आणखी 10-20 धावा करण्यात कमी पडलो, असं म्हटलं. हेच हार्दिकनेही पराभवानंतर सांगितलं. हार्दिकने काय म्हटलं? हे सविस्तर जाणून घ्या.

“खेळपट्टी ज्या पद्धतीने खेळ दाखवत होती. त्यानुसार निश्चितच आम्ही 20 धावा कमी केल्या. असं होतं. आम्ही वास्तवात चांगलं क्रिकेट खेळत होतो. आम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकलो नाहीत. त्याचा फटका आम्हाला सहन करावा लागला. आयपीएल असंच आहे. या फ्रँचायजीने (मुंबई इंडियन्स) 5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे, हे नेहमीच अवघड राहिलं आहे. जेव्हा तुम्ही वेग कमी करता तेव्हा इतर संघ जिंकण्यासाठी सज्ज असतात”, (players)असं हार्दिकने म्हटलं. तसेच हार्दिकने एलिमिनेटरबाबतही प्रतिक्रिया दिली आणि खेळाडूंना स्पष्ट संदेश दिला.

मुंबई या पराभवामुळे प्लेऑफमध्ये सर्वात शेवटी अर्थात चौथ्या स्थानी असणार आहे. त्यामुळे आता मुंबईला अंतिम फेरीत पोहचण्यासाठी 2 सामने जिंकावे लागणार आहेत. मुंबईला अंतिम फेरीत पोहचण्यासाठी एलिमिनेटनंतर क्वालिफायर-1 मध्ये पराभूत होणाऱ्या संघाविरुद्ध जिंकावं लागणार आहे. मुंबई एलिमिनेटर सामना हा 30 मे रोजी खेळणार आहे. एलिमिनेटर सामन्याआधी कॅप्टन हार्दिकने सहकाऱ्यांना संदेश दिला आहे. (players)“स्पष्ट संदेश आहे, हा फक्त एक झटका होता. यातून धडा घ्या, नॉकआऊटसाठी तयार रहा”, असं हार्दिकने म्हटलं.दरम्यान पंजाबकडून विजयी आव्हान हे 5 खेळाडूंनीच पूर्ण केलं आणि मुंबईवर दणदणीत विजय मिळवला. पंजाबसाठी जोश इंग्लिस याने सर्वात जास्त 73 रन्स केल्या. प्रियांश आर्या याने 62 धावा केल्या. प्रभसिमरन सिंह याने 13 धावांचं योगदान दिलं. तर कर्णधार श्रेयस अय्यर याने नाबाद 26 रन्स केल्या. तर नेहल वढेरा 2 धावा करुन नाबाद परतला.

हेही वाचा :

वैष्णवी हगवणे प्रकरण भोवले! रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

डोनाल्ड ट्रम्पचे ‘Air Force One’ जगात भारी; राजेशाही थाट पाहून तुमचेही डोळे दीपतील

हॉटेलमधून चेक आउट करताना रुममधील ‘या’ 5 वस्तू घरी घेऊन जाऊ शकता