आजचा श्रावणी सोमवार राशींसाठी भाग्यशाली! भगवान शंकर असतील पाठीराखा, आजचे राशीभविष्य वाचा

मेष रास
मेष राशीच्या लोकांनो आज एरवी व्यवहाराने वागणारे तुम्ही, परंतु (today)आज मात्र व्यवहाराशी फारकत होईल, कोणी तुम्हाला फसवणार नाही याची काळजी घ्यावी.

वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांनो आज अति भावना प्रधानतेमुळे तोटा(today) सहन करावा लागेल पैशाचा अति लोभ नुकसान करेल

मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांनो आज वास्तवाशी सांगड घालताना तारेवरची कसरत करावी लागेल

कर्क रास
कर्क राशीच्या लोकांनो आज वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घ्यावे लागेल महिलांना झोपेच्या तक्रारी जाणवतील

सिंह रास
सिंह राशीच्या लोकांनो आज घरामध्ये विवाह ठरवण्याच्या चर्चा रंगल्यामुळे तरुण वर्ग सुखावून जाईल प्रेम प्रकरणांमध्ये यश मिळेल

कन्या रास
कन्या राशीच्या लोकांनो आज राजकारणात मुरलेल्या लोकांना जनतेचा प्रतिसाद चांगला मिळेल, कामाचे उत्तम नियोजन आणि सूत्रबद्धता तुमचा दर्जा वाढेल

तूळ रास
तूळ राशीच्या लोकांनो आज व्यवसायात भागीदारास तुमच्या नवीन कल्पनांचे सुतवाचक कराल आणि त्यातून थोडेसे मतभेद निर्माण होतील

वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज तब्येत सांभाळा चुकीची औषधे घेत नाही ना याची काळजी घ्या

धनु रास
धनु राशीच्या लोकांनो आज एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली, तर मात्र मनावर ताबा ठेवणे आवश्यक असेल, थोडा अविचार होण्याची शक्यता आहे

मकर रास
मकर राशीच्या लोकांनो आज जोडीदाराला प्रवासाचे योग येण्याची शक्यता, त्यामुळे थोडी चिडचिड होईल महिलांनी प्रकृती सांभाळावी

कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांनो आज तरुणांना आपला आयुष्याचा जोडीदार सोडण्यासाठी उत्तम काळ आहेएखादा निर्णय घेताना स्वतःच संभ्रमात पडाल

मीन रास
मीन राशीच्या लोकांनो आज घरामध्ये हलकेफुलके वातावरण राहिले तरी शब्द हे शस्त्र आहे हे मात्र लक्षात ठेवायला हवे

हेही वाचा :

तुमचं खाते ‘या’ बँकेत आहे? मोठ्या बदलाची घोषणा
फुलांच्या जाळीदार साडीत जान्हवीचा ग्लॅमरस ‘परम सुंदरी’ अंदाज
इंग्लंड हादरलं! पाकिस्तानी खेळाडूवर महिलेवर अत्याचाराचे गंभीर आरोप