भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी मांजरी येथील आदिवासी विद्यार्थी आंदोलनावरून काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधी यांच्या आगामी महाराष्ट्र दौऱ्यापूर्वी हे आंदोलन पेटवण्याचा आरोप त्यांनी केला.

भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी पुण्याजवळील मांजरी येथील आदिवासी विद्यार्थी आंदोलनावरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेस हे आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. राहुल गांधी हे महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर येत आहे. तोपर्यंत हे आंदोलन पेटवण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांवर दबाव असल्याचा गंभीर आरोपही भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. राजकीय पोळीसाठी काँग्रेस या आंदोलनाची वापर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेस राजकीय पोळी भाजत आहे. हे आंदोलन पेटवण्याचे काम काँग्रेस करत आहे. राहुल गांधी हे लवकरच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. जोपर्यंत राहुल गांधी राज्याच्या दौऱ्यावर येत नाही. तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा दबाव या विद्यार्थ्यांवर टाकण्यात येत आहे, असा गंभीर आरोप भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. (Congress) आपल्या राजकीय फायद्यासाठी आणि राहुल गांधी यांचे राजकीय करिअर सेट करण्यासाठी विजय वडेट्टीवार हे त्यांच्या मुलीचे करिअर सेट करण्यासाठी आणि काँग्रेसचे नेते त्यांचे राजकीय करिअर सेट करण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून आपली राजकीय पोळी भाजत असल्याचा आरोप बन यांनी केला.
सरकारची विद्यार्थ्यांशी चर्चा गेल्या 16 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. सरकारने आंदोलकांशी गेल्या तीन ते चार वेळा चर्चा केली. स्वतः आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि मंत्री नरहरी झिरवळ हे आंदोलकांना जाऊन भेटले. त्यांच्याशी चर्चा केली. (Congress) त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या. (Congress) त्यासंदर्भात लिखीत आश्वासन सुद्धा दिलं. असं असताना राहुल गांधी यांचा राज्याचा दौरा होत नाही. तोपर्यंत आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना वेठीस धरण्यात येत असल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केला. हे आंदोलन तेवत आणि पेटवत ठेवण्याचे काँग्रेसचे षडयंत्र असल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केला आहे.
विद्यार्थ्यांशी तीनदा चर्चा झाली, चौथ्यांदा काय हजारव्यांदा बोलायलाही सरकार तयार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकार संवेदनशील आहे. काँग्रेस मात्र राजकारणात व्यस्त आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांसाठी सुविधा वाढल्या. काँग्रेसच्या काळात काय झालं? विद्यार्थ्यांचं शैक्षणिक करिअर घडवायचंय. काँग्रेसला मात्र राजकीय करिअरची चिंता आहे, अशी टीका त्यांनी केली .
संजय राऊतांना महायुतीत भांडण हवंय. आम्ही मात्र महाराष्ट्रासाठी एकदिलाने काम करतोय. फडणवीस-शिंदे एकत्र आहेत. राऊतांनी कितीही प्रयत्न केले तरी महायुतीत फूट पडणार नाही. मविआत काँग्रेस विरुद्ध पवार आहेत. ठाकरे गटात राऊत विरुद्ध आदित्य असा सामना होत आहे. महायुतीत मात्र समन्वय आहे. ‘शेकोटी’ पेटवण्याचं राजकारण राऊतांचं तर महाराष्ट्र घडवण्याचं काम महायुतीचं आहे, असे ते म्हणाले. राहुल गांधी-राऊत भेटीचा नेमका अजेंडा काय? कथित २ हजार कोटींच्या हप्त्याचा हिशोब द्या. काँग्रेसच्या दावणीला पक्ष बांधण्याआधी महाराष्ट्राला कथित डीलचा हिशोब द्या, अशी मागणी बन यांनी केली.
हेही वाचा :
इचलकरंजीत राजकीय भूकंप प्रकाश आवाडेंची लोकसभा लढण्याची तयारी खासदार माने गटाची धाकधूक वाढली?
महाराष्ट्रात पाऊस कोसळणार की नाही? जाणून घ्या आजचा हवामान अंदाज?
८ ते १० तास बैठे काम करताय ? हार्टला का आहे धोका डॉक्टरांनी सांगितले?