आयपीएलमधील 3 खेळाडूंना पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत बंदी, झालं असं की…

इंडियन प्रीमियर लीग २०२६ हंगामाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सुपर लीग मध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. आयपीएलमध्ये खेळण्याच्या निर्णयामुळे काही आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी पीएसएलमधून माघार घेतल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कठोर भूमिका घेत तीन खेळाडूंवर बंदी घातली आहे.

पीएसएलमध्ये निवड होऊनही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी करार मोडत आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंवर ही कारवाई करण्यात आली आहे. झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझरबानी याची इस्लामाबाद युनायटेड संघाकडून निवड झाली होती, मात्र त्याने करार मोडत कोलकाता नाईट रायडर्स संघात प्रवेश केला. (players) यामुळे त्याच्यावर पीएसएलमधून दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू दासुन शनाका हा लाहोर कलंदर्सकडून खेळणार होता, पण आयपीएलमधून ऑफर मिळाल्यानंतर त्याने राजस्थान रॉयल्स संघाची निवड केली. या निर्णयामुळे त्याच्यावर एका वर्षाची बंदी लादण्यात आली आहे. (players) तसेच दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू कॉर्बिन बॉश यालाही अशाच प्रकारे पीएसएलमधून माघार घेतल्याने शिक्षा भोगावी लागली आहे. पेशावर झल्मी संघाकडून खेळण्याची संधी असतानाही त्याने मुंबई इंडियन्स संघाकडून बदली खेळाडू म्हणून खेळण्याचा निर्णय घेतला. परिणामी त्याच्यावरही एका वर्षाची बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, काही खेळाडूंनी पीएसएलमध्येच खेळण्याचा निर्णय घेतला (players) असून डेवॉन कॉनवे, डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि एरॉन हार्डी यांसारखे स्टार खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या संपूर्ण घडामोडींमुळे आयपीएल आणि पीएसएल या दोन मोठ्या टी-२० लीगमधील स्पर्धा अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. भविष्यात खेळाडूंच्या करारांबाबत आणखी कडक नियम लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा

आता मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश; मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय

हादरवणारी घटना; आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

कॅन्सरची सुरूवातीची लक्षणे कोणती?